P L Deshpande
sakal
नाशिक: नवोदित पिढीला महाराष्ट्राचे लाडके लेखक पु. ल. देशपांडे कळावे व जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळावा, या हेतूने १४, १५, १६ नोव्हेंबरला ‘ग्लोबल पुलोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. मराठा विद्याप्रसारक संस्था, दीपक बिल्डर्स व शोकेस फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा गंगापूर रोड येथील आयएमआरटी सभागृह व रावसाहेब थोरात सभागृहात होणार आहे.