Flower Market
sakal
नाशिक: दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर गोदाघाटावर विविध ठिकाणांहून मोठ्या संख्येने झेंडू फूल विक्रेते दाखल झाले आहेत. अडीचशे रुपयांपासून चारशे रुपयांपर्यंत क्रेट्स उपलब्ध असून, किलोभर फुलांसाठी शंभर ते दीडशे रुपये दर आहेत. पिवळ्या सोन्याच्या विक्रीतून सकाळपासून रात्रीपर्यंत लाखो रुपयांची उलाढाल झाली.