Girish Mahajan
sakal
नाशिक: गोदावरी नदीची आपण पूजा करतो, गोदामाईला आई समान मानतो. मात्र कुंभमेळ्यात गोदेचे पाणी तीर्थ म्हणून कुणी पिणार नाही, कारण गोदावरी प्रदूषित आहे, ही वस्तुस्थिती म्हणूनच गोदावरीला पवित्र बनवायचे आहे. त्यासाठी कितीही पैसे लागले तरी चालेल अशी सरकारची भुमिका आहे. त्यामुळेच मलनिस्सारण प्रकल्प उभारला जात आहे. नाशिककरांनी स्वच्छ गोदावरीसाठी सहकार्य करावे, शहराची बदनामी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन कुंभमेळा मंत्री गिरीष महाजन यांनी केले.