Nandini River
sakal
नाशिक
Nashik Nandini River : नदीपात्रात 'रिटेनिंग वॉल'चे रहस्य! नाशिकमध्ये न्यायालयाच्या आदेशाची सर्रास पायमल्ली
HC Ban on Riverbed Construction Ignored in Nashik : नाशिकमधील टाकळीकडून जेल रोडकडे जाताना नंदिनी नदीपात्रात उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करून उभारलेली बेकायदेशीर रिटेनिंग वॉल. या बांधकामामुळे नदीचे पात्र संकुचित झाले असून, परिसरात भराव टाकून झोपडपट्टी वाढण्यास मदत होत आहे.
नाशिक: उच्च न्यायालयाच्या २०१८ च्या निर्देशानुसार नदीपात्रात काँक्रिटीकरणास बंदी घालण्यात आली आहे; परंतु नाशिक महापालिका हद्दीत न्यायालयाच्या निर्देशांची सर्रास पायमल्ली होत आहे. टाकळीकडून जेल रोडकडे जाताना नंदिनी पात्रात अचानक ‘रिटेनिंग वॉल’चे काम झाल्याचे निदर्शनास येते.
