Godavari Parikrama
sakal
पंचवटी: कलियुगात गोदावरी परिक्रमेला अनन्यसाधारण महत्त्व असून प्रभू श्रीरामचंद्र यांनी गोदावरीच्या पावनभूमीत १२ वर्षे वास्तव्य केले. अनेक संत-महंत ऋषिमुनींनी गोदावरीच्या तीरावर तपश्चर्या, आराधना केली आहे. धार्मिक महत्त्व असलेल्या या गोदावरी नदीची शनिवारी (ता. ६) उगमस्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर येथून सकाळी अकराला परिक्रमेस सुरुवात झाली. परिक्रमा रात्री दहाला छत्रपती संभाजीनगरातील पैठण येथे पोहोचली असून, तेथे मुक्कामी आहे.