Sadhu sant
sakal
पंचवटी: कलियुगामध्ये गोदावरी परिक्रमाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. प्रभू श्रीराम यांनी गोदावरीच्या पावन भूमीत बारा वर्ष वास्तव्य केले आहे. अनेक संत महंत ऋषिमुनींनी या गोदावरी नदीच्या तीरावर तपश्चर्या, आराधना केली आहे. धार्मिक महत्त्व असलेल्या या गोदावरी नदीची शनिवार (ता. ६) पासून उगमस्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर येथून परिक्रमा करण्यात येणार आहे. तर २१ डिसेंबरला त्र्यंबकेश्वर येथे सकाळी समारोप होणार आहे.