नाशिक- चोवीस तासांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेनंतर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे यंदा तिसऱ्यांदा दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोचले. दरम्यान, जोरदार पावसानंतर महापुराच्या धास्तीने नदीकाठच्या व्यावसायिकांत भीतीचे वातावरण आहे. सायंकाळी अनेकांची टपऱ्या हलविण्याची लगबग सुरू होती.