Panveli stocking near Saikheda Bridge
Panveli stocking near Saikheda Bridge esakal

Nashik Godavari Pollution : गोदावरीची अवकळा संपणार कधी? चाटोरीकरांनी घेतला पुराचा धसका...

Published on

Nashik News : गोदावरी नदी प्रदूषण दिवसेंदिवस गंभीर वळण घेत आहे. नदीच्या प्रदूषणावर अनेक नेत्यांनी राजकारण केले; शहर ग्रामीण वादही झाले पण नदीचे प्रदूषण काही हटले नाही. (Godavari river pollution is taking serious turn day by day nashik news )

सध्या जलपर्णी व प्रदूषणामुळे गोदावरी नदी मरणयातना सहन करत आहे. नाशिकमध्ये काढलेल्या पानवेली येथील पात्रात येऊन अडकत असल्याने साठलेल्या पाण्यात पानवेलींच्या बीजनिर्मितीची प्रक्रिया होते. सद्यःस्थितीत सायखेडा पुलापासून दूरपर्यंत पानवेली पसरलेल्या असून, पाण्यावर हिरवेगार मैदानाची निर्मिती झाल्याचा भास होतो आहे. ठराविक दिवसांनी पानवेली कुजत असल्याने संपूर्ण परिसरात डासांची निर्मिती होऊन रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

याच पानवेली पुढे करंजगाव- कोठुरे येथे पुलाला अडकल्यानंतर गोदावरीच्या पाण्याचा फुगवटा तयार होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर वाढणाऱ्या पानवेली समूळ नष्ट कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

औद्योगिक विभागातील दूषित पाणी नदीमध्ये सोडण्याची जणू स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे. गोदावरी प्रदूषणामध्ये जेवढा नाशिक शहराचा वाटा आहे, तितकाच गोदाकाठच्या गावांचा अने गावागावांतील सांडपाणी थेट गोदावरी नदीमध्ये सोडणाऱ्यांचाही आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Panveli stocking near Saikheda Bridge
Jalyukt Shivar Yojana : जलयुक्त शिवारच्या 210 गावांमध्ये उद्यापासून शिवारफेरी; वेळापत्रक जाहीर

त्याला अटकाव घालणार कोण? असा प्रश्न आहे. जिल्ह्यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यरत आहे की नाही, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. चांदोरीला पाण्याचा दर्प नागरिकांना सहन होत नाही हे प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिसत नाही का? असाही प्रश्न नागरिकांना पडला आहे.

चाटोरीकरांनी घेतला पुराचा धसका

गतवर्षी गोदावरीला महापूर आला होता, त्यात चाटोरी गावच्या शेतीची प्रचंड वित्तहानी झाली. गोदा पात्रातील जलपर्णी या पाण्याबरोबर शेतात वाहून आल्याने पिकांवर त्याचा थर पडलेला होता. जलपर्णी हा प्रश्‍न सोडविण्यासाठी चांदोरी सायखेडा व चाटोरी गावचे नागरिक आग्रही आहेत.

गोदाकाठच्या या प्रश्‍नावर अनेक पदाधिकाऱ्यांनी यावर आवाज उठविला असून पुराचे पाणी गावात शिरण्याचे प्रमुख कारण हे नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहाला अडथळे ठरणारी जलपर्णी असल्याचा दावा केला आहे.

Panveli stocking near Saikheda Bridge
Nashik ZP News : जिल्हा परिषदेची 152 कोटींची देयके प्रलंबित

सध्या सायखेडा चांदोरी मोठ्या पुलावर प्रचंड जलपर्णी अडकलेली आहे. पावसाळ्यापूर्वी गोदावरी नदी स्वच्छता मोहीम राबवून पुराची समस्या दूर करावी, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

"सायखेडा पुलाला पानवेली अडकल्यानंतर प्रवाहाला अडथळा ठरत पाणी शेजारील शेतात जाते, त्याबरोबर पानवेलीही वाहून येतात." - दीपक कदम, ग्रामस्थ चाटोरी

"जलपर्णीची समस्या नेहमीचीच आहे, गोदाकाठच्या गावांची पाणीपुरवठा योजना गोदावरी नदीवर अवलंबून आहे. काही दिवसात पानवेली कुजल्या की डासांचे प्रमाण वाढते." - अशपाक शेख, ग्रामपालिका सदस्य, सायखेडा

Panveli stocking near Saikheda Bridge
Nashik News : वनविभागातर्फे अमृत वनउद्याने! दुर्मिळ-औषधी वनस्पतींची लागवड...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com