esakal | गटारीचे पाणी मिसळल्याने गोदावरी वाहू लागली दुथडी भरुन!
sakal

बोलून बातमी शोधा

Godavari

गटारीचे पाणी मिसळल्याने गोदावरी वाहू लागली दुथडी भरुन!

sakal_logo
By
दत्ता जाधव

पंचवटी (नाशिक) : गेल्या दोन दिवसांपासून शहर परिसरात संततधार सुरू आहे. त्यामुळे सर्वच गटारी व नाले ओव्हर फ्लो झाले आहेत. गंगापूर धरणात अवघा ३७ टक्के जलसाठा असूनही, गोदावरी प्रथमच दुथडी वाहू लागली आहे. या पाण्यात मोठ्या प्रमाणात पानवेलीसह गटारीतील घाण पाणी वाहून आल्याने पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे रामकुंड परिसरात सकाळी धार्मिक विधीसाठी येणाऱ्यांसह पुरोहितवर्गाची तारांबळ उडाली. Godavari river started flowing due to mixing of sewage water


शहर परिसरात जोरदार हजेरी लावल्याने गंगापूर धरण समूहातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे नाशिककरांवरील एक दिवसाची पाणीकपात दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन दिवसांपासून जोरदार पावसाला सुरवात झाल्याने गंगापूर रोडसह अन्य भागातील गटारी ओव्हर फ्लो होऊन त्याचे पाणी थेट गोदावरीला येऊन मिळाले. त्यामुळे गोदावरी दुथडी वाहत असलीतरी या पाण्याला गटारीच्या पाण्याचा दर्प येऊ लागला आहे. त्यातच पात्रात पाणी नसल्यामुळे अडकून पडलेल्या पानवेली रामकुंड, गांधीतलाव परिसरात अडकून पडल्या आहेत. गुरुवारी (ता.२२) सकाळी दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पाणी पोचले होते. मात्र, पाण्याला दर्प येत असल्याने अनेकांनी नापसंती व्यक्त केली. नदीपात्रात ठिकठिकाणी वाहून आलेल्या पानवेली अडकल्या आहेत.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यातील धरणसाठ्यात २४ तासात समाधानकारक वाढ


धार्मिक विधींमध्ये व्यत्यय

पावसामुळे गंगापूर धरणातून थेंबभरही पाण्याचा विसर्ग न करता गोदावरी दुथडी वाहू लागली. नदीकाठच्या लहान- मोठ्या ओहोळांसह गटारींचे पाणी नदीपात्रात मिसळल्याने पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे रामकुंड परिसरात सकाळी धार्मिक विधी करणाऱ्यांसह पुरोहितवर्गाची तारांबळ उडाली. रामकुंडावरही पाण्याला उग्र दर्प येत असल्याने विधीसाठी आलेल्यांनी केवळ दर्शनावरच समाधान मानले.

हेही वाचा: नाशिक : अखेर 'तो' बहुचर्चित आंतरधर्मिय विवाह संपन्न


सांडव्याची भिंत कोसळली

गोदावरी नदीवर गाडगे महाराज पुलाच्या खालील बाजूस रोकडोबा मंदिरासमोर सांडवा आहे. या सांडव्याच्या दोन्ही बाजूला संरक्षण म्हणून छोटा कठडा बांधण्यात आलेला आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे या सांडव्याच्या एका बाजूची भिंत कोसळली. सुदैवाने कोणीही नसल्याने इजा झाली नाही.

loading image