esakal | नाशिक : अखेर 'तो' बहुचर्चित आंतरधर्मिय विवाह संपन्न
sakal

बोलून बातमी शोधा

hindu-muslim inter religious wedding

नाशिक : अखेर 'तो' बहुचर्चित आंतरधर्मिय विवाह संपन्न

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : नाशिक येथे गेल्या महिन्या पासुन आंतरधर्मिय विवाहाची चर्चा चालू होती. त्यात अनेक वादही झाले. मुलीच्या जातीची जातपंचायत व काही धार्मिक संघटनांनी यास कडाडून विरोध केला होता. पण तरीही हा विवाह सोहळा आज हाॅटेल एस एस के येथे अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. (hindu-muslim-inter-religious-wedding-ceremony-finally-held-in-nashik)

हिंदु व मुस्लिम दोन्ही पध्दतीने हा विवाह लावण्यात आला. या विवाह सोहळ्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दल व छात्रभारती यांचे कार्यकर्ते पाठिंब्यासाठी हजर होते. संविधानाला अभिप्रेत असणारी ही कृती असल्याचे समाधान कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

नाशिकमध्ये आजोजित केलेला हा हिंदू व मुस्लिम आंतरधर्मिय विवाह सोहळा चांगलाच चर्चेत राहिला. सुरवातीला सोशल मीडियावर आलेली या लग्नपत्रिका बघून अनेकांनी या विवाह सोहळ्याला विरोध दर्शविला होता. त्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संबंधित परिवाराची भेट घेत हा विवाह सोहळा कसा होत नाही ते बघतो. एवढेच नव्हे तर या विवाह सोहळ्याला हजेरी लावून नाचतो देखील असे आव्हानात्मक वक्तव्य केले होते. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चिघळले होते.

हेही वाचा: 'नाशिक-पुणे मार्गावरील टोल वसुली कशासाठी? तत्काळ बंद करा'

या लग्नास मुलीच्या जात पंचायतने प्रखर विरोध दर्शविला होता, विवाहाचे पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितावर सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. असे करणे म्हणजे जात पंचायतच्या सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याचा भंग आहे. हे लक्षात आणून दिल्यानंतर विरोध मावळला व विवाह सोहळा शांतपणे उत्साहात पार पडला.

- कृष्णा चांदगुडे, कार्यवाह, अंनिसचे जात पंचायत मूठमाती अभियान

(hindu-muslim-inter-religious-wedding-ceremony-finally-held-in-nashik)

हेही वाचा: नाशिक : कारवर झाड कोसळून तीन शिक्षकांचा जागीच मृत्यू!

loading image