Sewer Line Project
sakal
नाशिक: नुकत्याच निवडून आलेल्या नगरसेवकाने लोकांची कामे करण्याऐवजी गोदाकाठी कन्नमवार पुलाजवळ मलजलवाहिनी टाकण्याचे काम बंद पाडले. सिंहस्थासाठी होणाऱ्या या कामात अडथळा निर्माण झाल्याची बाब आयुक्त मनीषा खत्री यांना समजल्यावर त्यांनी तत्काळ जागेवर जाऊन काम सुरू केले व स्वतः श्रीफळ वाढवून मलवाहिनीचे काम सुरू केले.