नाशिक- गोदावरीचे गटारीकरण झाले आहे. नाशिकचे रामतीर्थ व त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तामधील पाणी प्रदूषित झाले आहे. या पाण्यामध्ये स्नान करणे सोडा; पण ते हातात घेण्यायोग्य नसल्याची कबुली खुद्द जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी साधू-महंतांसमक्ष दिली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात सर्वांना विश्वासात घेतले जाईल, असे सांगताना साधू-महंतांनी सहकार्य करावे, असे आर्जवदेखील त्यांनी केले.