गुरुपुष्यामृत योगादिवशी सोने दीड, चांदी 4 हजारांनी स्वस्त! सराफा बाजारात वर्दळ|Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gold

गुरुपुष्यामृत योग : सोने दीड, चांदी 4 हजारांनी स्वस्त! |Nashik

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : दिवाळीनंतर आता लग्नसराई (wedding season) सुरू झाली आहे. त्यामुळे सराफा बाजारपेठेत वर्दळ पाहायला मिळत आहे. नाशिकच्या सराफा बाजारात (nashik gold market) आज गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सोन्याच्या दरात जवळपास दीड हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात चक्क 4 हजार रुपयांची घसरण पाहायला मिळाली. जाणून घ्या भाव..(gold and silver price)

गुरुपुष्यामृत योग : सोने दीड, चांदी 4 हजारांनी स्वस्त!

आज (ता.२५) सोन्याच्या दरामध्ये साधरणतः दीड हजार रुपयांची घसरण पाहायला मिळाली, तर चांदीचे दर किलो मागे 4 हजार रुपयांनी स्वस्त झालेली पाहायला मिळाली. दरम्यान, येणाऱ्या काळात सोने महाग होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. 22 नोव्हेंबर रोजी नाशिकच्या सराफा बाजारपेठेत 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 49400 रुपये नोंदवले गेले. 22 कॅरेट सोन्याचे दर 47950 नोंदवले गेले होते. चांदीचे दर किलोमागे 67800 रुपये होते. 24 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 47850 रुपये नोंदवले गेले. 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 46300 रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे 65500 रुपये नोंदवले गेले. वाचा गुरुवार (ता.25) नाशिकच्या सराफा बाजारातील आजचा भाव...

हेही वाचा: राज्यात तिसरी लाट येणार? 92 लाख लोकांनी केला 'हा' निष्काळजीपणा

गुरुवार (ता.25) नाशिकच्या सराफा बाजारातील आजचा भाव

24 कॅरेट सोन्याचे दर 47900 रुपये,

22 कॅरेट सोन्याचे दर 46300 रुपये .

हेही वाचा: त्रिपुरात तातडीने CAPF च्या तुकड्या पाठवा, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

loading image
go to top