दीपोत्सवानंतर सुवर्ण बाजारात मोठी घसरण
(उपशीर्षक)
सोने अडीच हजारांनी स्वस्त; उत्सवात मोठी उलाढाल
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १२ ः दीपोत्सवात येथील सराफ बाजारात सोने व चांदीच्या भावात सातत्याने वाढ झाली, तरी धनत्रयोदशी व लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर अनेकांनी सोने- चांदीची आभूषणे खरेदी केली. यामुळे दीडशे ते दोनशे कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. मागील दोन दिवसांनंतर सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण झाली. बुधवारी (ता. ११) सोन्याचा भाव एक लाख ४१ हजार ५०० रुपये (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) होता. गुरुवारी (ता. १२) सुवर्ण बाजार खुला झाल्यावर सोन्याचा भाव अडीच हजार रुपयांनी कमी होऊन सोने एक लाख ३९ हजार रुपयांवर आले; तर चांदीचा भावही तब्बल पाच हजार रुपयांनी कमी झाला. बुधवारी एक लाख ९० हजार (प्रतिकिलो विनाजीएसटी) रुपयांवर असलेली चांदी गुरुवारी एक लाख ८५ हजार रुपयांपर्यंत खाली आली.
चौकट
काही दिवसांतील सोन्या-चांदीचे भाव
तारीख---सोने प्रतिदहा ग्रॅम--- चांदी प्रतिकिलो (विनाजीएसटी)
८ नोव्हेंबर---१ लाख ४२ हजार--- १ लाख ८८ हजार
९ नोव्हेंबर---१ लाख ४३ हजार ५००--- १ लाख ९१ हजार
१० नोव्हेंबर---१ लाख ४२ हजार ८००--- १ लाख ९० हजार
११ नोव्हेंबर---१ लाख ४१ हजार ५००--- १ लाख ९० हजार
१२ नोव्हेंबर---१ लाख ३९ हजार--- १ लाख ८५ हजार