esakal | Diwali 2020 : लक्ष्मीपूजनालाही सोन्याची झळाळी कायम! वाया गेलेले प्रमुख मुहूर्त भरून निघण्यास मदत
sakal

बोलून बातमी शोधा

gold jwellery scheme.jpg

सोने-चांदी खरेदीच्या उत्साहामुळे सराफ बाजाराला झळाळी मिळाली.चाळीस कोटींच्या उलाढालीचा सराफ व्यावसायिकांचा अंदाज आहे. लॉकडाउनमुळे वाया गेलेला अक्षयतृतीय, गुढीपाडव्याचा मुहूर्त दिवाळीत भरून निघाल्याची भावना सराफ व्यावसायिकांत आहे. 

Diwali 2020 : लक्ष्मीपूजनालाही सोन्याची झळाळी कायम! वाया गेलेले प्रमुख मुहूर्त भरून निघण्यास मदत

sakal_logo
By
दत्ता जाधव

नाशिक : सोने-चांदी खरेदीच्या उत्साहामुळे सराफ बाजाराला झळाळी मिळाली.चाळीस कोटींच्या उलाढालीचा सराफ व्यावसायिकांचा अंदाज आहे. लॉकडाउनमुळे वाया गेलेला अक्षयतृतीय, गुढीपाडव्याचा मुहूर्त दिवाळीत भरून निघाल्याची भावना सराफ व्यावसायिकांत आहे. 

दिवाळीत सोन्याची झळाळी चाळीस कोटींची 

वर्षातील साडेतीन मुहूर्तावरील खरेदीला विशेष महत्त्व दिले जाते. कुटुंबातील विवाहासारख्या सण उत्सवाचे दागिणे खरेदीसाठी याच मुहूर्ताची निवड होते. त्यामुळे साडेतीन मुहूर्त सराफी व्यवसायाला उभारी देणारे असतात. पण यंदा लॉकडाउनमुळे अक्षयतृतीया, गुढीपाडवा असे प्रमुख मुहूर्त वाया गेले. पण शुक्रवारी (ता.१३) धनत्रयोदशीपासून नागरिकांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दुचाकी, चारचाकी व घरांच्या खरेदीला व ताब्याला अनेकांनी महत्त्व दिले. सराफी पेढ्यांत गर्दी होती. आजही सकाळपासून सराफी पेढ्यांमध्ये गर्दी होती. 

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात 

सोने खरेदीतील उत्साह टिकून 
सोन्याने पन्नास हजारांचा टप्पा ओलांडला असला तरी गुंतवणुकीसाठी अद्यापही ग्राहकांची पहिली पसंती सोन्यालाच राहिल्याचे गंगापूर रोडवरील मयूर अलंकारचे संचालक राजेंद्र शहाणे यांनी सांगितले. कालचा धनत्रयोदशीचा योग साधत ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली, तसाच उत्साह आजही कायम असल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. बाजारात आज २४ कॅरेट सोन्याला ५१ हजार सहाशे, तर किलोभर चांदीसाठी ६६ हजार पाचशे इतका भाव होता. 

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

कोरोनाचे संकट असूनही बाजारात तब्बल चाळीस कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. कोरोनामुळे यंदा अनेक व्यावसायिकांनी मिठाईएवजी ग्राहकांना चांदीच्या वस्तू गिफ्ट देण्याला पसंती दिली. त्यामुळे सोन्याबरोबरच चांदीतही तेजी राहिली. - चेतन राजापूरकर (अध्यक्ष, सराफ असोसिएशन, नाशिक)