मेनफिचर
शहर-जिल्हा टुडे पान तीनसाठी
-----------------
(आणखीन एक कोट येणार आहे)
------------
पितृपक्षामुळे सोने-चांदीची ‘झळाळी’ पडली फिकी
----
ग्राहकांची खरेदीकडे पाठ; सुवर्णबाजार थंडावला, आता विजयादशमीची आशा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २ : पितृपक्षात शुभकार्ये केली जात नाहीत. त्यासोबतच मोठ्या वस्तूंची खरेदीही केली जात नाही. पितृपक्षाचा सुवर्णबाजारापेठेवर विपरीत परिणाम झाला आहे. गेल्या २७ सप्टेंबरला पितृपक्ष सुरू झाला. तेव्हापासून सोने, चांदीचे भाव सातत्याने कमी होत आहेत. ग्राहकांनी, गुंतवणूकदारांनी सोने, चांदी खरेदीकडे पाठ फिरविल्याचे चित्र सुवर्णबाजारपेठेत पाहावयास मिळत आहे. मात्र, आगामी नवरात्रोत्सव नंतर येणारा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला विजया दशमी (दसरा) यादिवशी सोने, चांदीत मोठी उलाढाल होईल, अशी आशा सुर्वण व्यावसायिकांना आहे.
गणेशोत्सवात (ता.१४ सप्टेंबर) सोने चांदी तेजीत होते. एक लाख ५१ हजार रुपये सोने (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) व दोन लाख तीन हजारांवर (प्रतिकिलो, विना जीएसटी) चांदी होती. त्यात १८ सप्टेंबरला वाढ झाली. सोने एक लाख ५२ हजार ५०० (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी), तर चांदीत दोन लाख ४१ हजारांवर पोहोचली. नंतर सोन्यात कधी एक हजार रुपयांची, तर चांदीत तीन हजारांची घसरण झाली. अनंत चतुर्दर्शीला (ता.२५) सोने एक लाख ५० हजारांवर, तर चांदीत दोन लाख ३२ हजारांपर्यंत खाली आले.
त्यानंतर सोने चांदीत घसरण सुरूच आहे. गेल्या २७ सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झाला आहे. यात दोन दिवस सोने चांदीत चलती होती. २९ सप्टेंबरला सोने, चांदीत मात्र वाढ झाली. सोने १ लाख ५१ हजार तर चांदीत २ लाख ३५ हजारांवर पोचली. नंतर पुन्हा सोने १ लाख ४७ हजार ३०० तर चांदी २ लाख ३२ हजारांपर्यंत खाली आले होते. आज सोने १ लाख ४९ हजार व चांदी २ लाख २६ हजारांवर स्थिर आहे.
-------------
अजून आठवडभर चित्र स्थिर
सुवर्ण व्यावसायिकांच्या अभ्यासानुसार सोने, चांदीचे मार्केट सध्या डाऊन आहे. नवरात्रोत्सवापासून भावात थोडी सुधारण होईल. विजया दशमीला मार्केट तेजीत असेल ते पुढे दिवाळी, नंतर लग्नसराइपर्यंत कायम असेल. आगामी काळात सोने सुमारे दोन लाख ते चांदीत तीन ते साडेतीन लाखांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज आहे.
----------
कोट
सध्या सुवर्णबाजारपेठेत मंदी आहे. पितृपक्षामुळे ग्राहकांची संख्या कमी आहे. भावही कमी आहे. नवरात्रोत्सव व नंतर भावात तेजी येण्याची अपेक्षा आहे. आगामी काळ सोने, चांदीच्या खरेदीसाठी चांगला आहे.
- पवनकुमार, संचालक, आर. बी. गोल्ड ज्वेलर्स.
-------
काही दिवसांतील सोने, चांदीचे भाव
तारीख--सोने प्रति दहा ग्रम--चांदी प्रतिकिलो (विना जीएसटी)
१४ सप्टेंबर--१ लाख ५१ हजार --२ लाख ३२ हजार
१८ सप्टेंबर--१ लाख ५२ हजार ५००--२ लाख ४१ हजार
२१ सप्टेंबर--१ लाख ५२ हजार--२ लाख ३८ हजार
२२ सप्टेंबर --१ लाख ५१ हजार--२ लख ३५ हजार
२५ सप्टेंबर--१ लाख ५० हजार--२ लाख ३२ हजार
२९ सप्टेंबर--१ लाख ४७ हजार ३००--२ लाख २५ हजार
३० सप्टेंबर--१ लाख ४८ हजार ८००--२ लाख २५ हजार
१ आक्टोबर--१ लाख ४८ हजार ५०० --२ लाख २५ हजार
१ आक्टोबर--१ लाख ४९ हजार --२ लाख २६ हजार
-------