सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण
(उपशीर्षक)
खरेदीदारांना मोठा दिलासा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ ः सुवर्ण बाजार खुला झाल्यानंतर गुरुवारी (ता. २२) सोन्याचे भाव हजार, तर चांदीचे भाव तब्बल सात हजार रुपयांनी कमी झाले. काही दिवसांपासून भावात सातत्याने घसरण होत असून, अजूनही भाव कमी होण्याची शक्यता आहे. चांदीचे भाव दोन लाखांखाली जाण्याची शक्यता आहे.
या आठवड्यात सोने-चांदीचे भाव मोठ्या फरकाने कमी होत आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावरही सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण झाली होती. बुधवारी (ता. २१) सोने-चांदीच्या भावात किरकोळ वाढ झाली. गुरुवारी पुन्हा भावात मोठी घसरण झाली.
गुरुवारी सुवर्ण बाजार खुला झाल्यानंतर चांदीचा भाव सहा हजारांनी खाली आला. दुपारनंतर आणखी हजार रुपयांनी भाव कमी झाले. बुधवारी सोन्याचा भाव एक लाख ४४ हजार ५०० रुपये (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) होता. गुरुवारी सकाळी सोन्याचे भाव हजार रुपयांनी कमी झाले. तर चांदीचे भाव बुधवारच्या तुलनेत सात हजारांनी कमी झाले. बुधवारी दोन लाख ११ हजार (प्रतिकिलो विनाजीएसटी) रुपयांवर असलेली चांदी गुरुवारी दोन लाख चार हजारांपर्यंत खाली आली.
काही दिवसांतील सोन्या-चांदीचे भाव
तारीख---सोने प्रतिदहा ग्रॅम--- चांदी प्रतिकिलो (विनाजीएसटी)
१७ ऑक्टोबर---१ लाख ४६ हजार ५००--- २ लाख १२ हजार
१८ ऑक्टोबर---१ लाख ४६ हजार ५००--- २ लाख १२ हजार
१९ ऑक्टोबर---१ लाख ४६ हजार ५००--- २ लाख १४ हजार
२० ऑक्टोबर---१ लाख ४४ हजार ७००--- २ लाख १० हजार
२१ ऑक्टोबर---१ लाख ४४ हजार ५००--- २ लाख ११ हजार
२० ऑक्टोबर---१ लाख ४३ हजार ५००--- २ लाख ४ हजार