ISRO News : इस्त्रोच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागाची विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी; जाणून घ्या सविस्तर माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ISRO Education

ISRO News : इस्त्रोच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागाची विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी; जाणून घ्या सविस्तर माहिती

इगतपुरी : शालेय पातळीवर इयत्ता नववीत शिक्षण घेत असलेल्या राज्यभरातील विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (ISRO) प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली आहे. बाल शास्त्रज्ञांसाठीचा युविका म्हणजेच युवा विज्ञानी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या १५ ते २६ मेपर्यंत इस्रोच्या केंद्रांवर हा कार्यक्रम होईल.

विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञान, तंत्रज्ञान, नवे शोध आणि करिअरच्या वाटांबद्दल लहान वयातच योग्य दिशा मिळावी म्हणून या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. इस्रोच्या अधिकृत संकेतस्थळावर या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे निवड प्रक्रियेत ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना १५ टक्के अधिक गुण मिळणार असून, याचा थेट फायदा जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना होणार आहे. गुणवत्ता यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या जाण्या-येण्याचा व राहण्याचा खर्च इस्रोतर्फे करण्यात येणार आहे. अधिक माहिती आणि अर्जासाठी

https://www.isro.gov.in/YUVIKA.html या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

असे आहे वेळापत्रक :

* ३ एप्रिल : अर्ज भरण्याची मुदत

* १० एप्रिल : पहिली निवड यादी

* २० एप्रिल : दुसरी निवड यादी

* १४ मे : विद्यार्थी इस्रोच्या केंद्रांवर हजर होणे

* १५ ते २६ मे : युविका विज्ञान शिबीर.

अशी मिळणार सवलत :

* इयत्ता आठवीतील किंवा शेवटच्या परीक्षेतील गुण : ५० टक्के

* ऑनलाइन क्विझमधील कामगिरी : १० टक्के

* विज्ञान प्रदर्शनात सहभाग : १७ टक्के

* ऑलिम्पियाड परीक्षेतील रँक : ११ टक्के

* क्रीडा स्पर्धांचे विजेते : ११ टक्के

* स्काऊट आणि गाईड, एनसीसी, एनएसएस : ५ टक्के

* ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत जिल्हा परिषद किंवा इतर शाळेतील विद्यार्थी : १५ टक्के.

येथे होणार शिबीर

* इंडियन इन्स्टिट्युट ऑफ रिमोट सेंसिंग, डेहराडून

* विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तिरुअनंतपुरम

* सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा

* यू. आर. राव सॅटेलाईट सेंटर, बेंगळुरू

* स्पेस अॅप्लिकेशन सेंटर, अहमदाबाद

* नॅशनल रिमोट सेन्सिग सेंटर, हैदराबाद

* नॉर्थ ईस्ट स्पेस अॅप्लिकेशन सेंटर, शिलाँग