ISRO ने रचला इतिहास, भारताचा सर्वात मोठा LVM3 रॉकेट केला लाँच, वाचा काय आहे खासियत

LVM3 रॉकेटने सकाळी 9 वाजता श्री हरिकोटावरुन अवकाशात आकाशात उड्डाण घेतली
LVM3-M3 OneWeb India-2 mission with 36 satellites
LVM3-M3 OneWeb India-2 mission with 36 satellitessakal

LVM3-M3 OneWeb India-2 mission : इस्रोने आज एकासोबत 36 उपग्रह लाँच केले. ब्रिटिश कंपनीच्या उपग्रहांना घेऊन LVM3 रॉकेटने सकाळी 9 वाजता श्री हरिकोटावरुन अवकाशात आकाशात उड्डाण घेतली.

विशेष म्हणजे हे रॉकेट आपल्यासोबत अंतराळात एकत्र 36 सॅटेलाइट घेऊन गेल्याने एक वेगळा इतिहास रचलाय. (ISRO launched LVM3-M3 OneWeb India 2 mission with 36 satellites read details)

साडे 43 मीटर लांबीच्या इस्रोच्या या रॉकेटनी ब्रिटेनच्या एका कंपनीचे 36 उपग्रह आपल्यासोबत घेऊन अवकाशात झेप घेतली. उपग्रहांना घेऊन LVM3 ने झेप घेतल्यानंतर त्याचं एकूण वजन 5 हजार 805 टन आहे. या मिशनला LVM3-M3/वनवेब इंडिया-2 असं नाव देण्यात आलं. इस्रोने ट्वीट करुन या मिशनच्या लाँचिगची माहिती दिली होती.

LVM3-M3 OneWeb India-2 mission with 36 satellites
ISRO Satellite Launched: इस्त्रोच्या 'बाहुबली LVM3'चे व्यवसायिक प्रक्षेपण यशस्वी

72 उपग्रह लाँच करण्याचा करार

LVM3 इस्रोचा सर्वात मोठा रॉकेट आहे ज्याने आता पर्यंत पाच वेळा यशस्वी उड्डाण केले आहे. ज्यामध्ये चंद्रयान-2 मिशनसुद्धा सहभागी आहे. मुळात ब्रिटेनची वनवेब ग्रुप कंपनीने इस्रोच्या वाणिज्यिक शाखा न्यूस्पेस इंडिया लिमिटेडपासून 72 उपग्रह लाँच करण्याचा करार केला आहे.

LVM3-M3 OneWeb India-2 mission with 36 satellites
Interesting Science Fact : तुम्हाला कोणाच्या स्पर्शाने कधी करंट लागलाय? हे प्रेम नाही तर सायन्स आहे

23 उपग्रह पृथ्वीच्या कक्षात

यामध्ये 23 ऑक्टोबर 2022 ला 23 उपग्रह इस्रोने याआधीच लाँच केले होते. आज बाकी असलेले 23 उपग्रह पृथ्वीच्या कक्षात जाणार. इस्रोच्या या लाँचिगमुळे पृथ्वीच्या कक्षेत वेब वन कंपनीचे उपग्रहांची एकूण संख्या 616 होणार. इस्रोचा या वर्षीचा हा दुसरा लाँच आहे.

इस्रोची ही लाँचिग यशस्वी झाली तर

जर ही लाँचिग यशस्वी झाली तर वनवेब इंडिया-2 स्पेस मध्ये 600 पेक्षा जास्त लोअर अर्थ ऑर्बिट सेटेलाइट्सच्या कान्स्टलेशन पुर्ण करणार. सोबतच यामुळे जगातील प्रत्येक स्पेस आधारीत ब्रॉडबँड इंटरनेट योजनामध्ये मदत मिळणार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com