Nashik News : गोंदेश्वर मंदिराचे कोरीव नक्षीकाम धोक्यात! पुरातत्त्व विभागाने लक्ष देण्याची मागणी

Shivlinga in Gondeshwar temple here. The second photo shows the cracks in the core of the temple.
Shivlinga in Gondeshwar temple here. The second photo shows the cracks in the core of the temple.esakal

गोंदेगाव (जि. नाशिक) : निफाड तालुक्यात हेमांडपंथी बांधकाम असलेली बोटांवर मोजता येतील इतकीच मंदिरे आहेत. त्यात गोंदेगाव येथील गोंदेश्वर मंदिराचा उल्लेख करावा लागेल.

ऐतिहासिक महत्त्व सांगणाऱ्या मंदिराचा ठेवा जपण्यासाठी लोकवर्गणीतून ग्रामस्थांनी डागडुजी केलेले हे मंदिर चांगल्या स्थितीत उभे असल्याचे दिसत असले, तरी आतील कोरीव नक्षीकामांची पडझड होत आहे.

घुमटास तडे देखील जात आहेत. त्यामुळे हेमांडपंथी मांडणी असलेल्या गोंदेश्वर मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे लक्ष कधी जाणार? असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. (Gondeshwar temple carvings in danger Archeology Department calls for attention Nashik News)

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

Shivlinga in Gondeshwar temple here. The second photo shows the cracks in the core of the temple.
Nashik News : येवला शहरात 25 कोटींची कामे मंजूर; आमदार दराडे बंधूंचा पाठपुरावा

हेमांडपंथी मांडणी, आकर्षक मूर्ती, कोरीव नक्षीकाम, प्राचीन संस्कृतीचे रेखाटने या मंदिराच्या आतील गोल घुमटावर बघायला मिळतात. वन्यप्राण्यांची शिल्प, अप्सरा, यक्ष, गंधर्व यांचे नृत्यकाम, देवी देवतांच्या पाषाणमूर्ती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या मनाचा ठाव घेतात.

भेट देणाऱ्या पर्यटकांना तासनतास खिळवून ठेवतात. नुकत्याच केलेल्या मंदिर जिर्णोद्धारवेळी जमिनीत गाडलेल्या पायऱ्या नागरिकांना दिसल्या होत्या. त्याचा शोध घेऊन पुरातत्त्व विभागाने उत्खनन केल्यास सध्या दिसणाऱ्या मंदिराच्या रचनेत बदल होऊन विविध माहितीचा ठेवा अभ्यासकांसाठी येथे उपलब्ध होऊ शकतो.

सोबत, या मंदिराच्या पूर्वेकडून वाहणारी ‘देव’ नदी नावाची नदी नामशेष कशी झाली, याचा देखील मागोवा घेता येईल.

"ग्रामीण पर्यटनाचा दर्जा मिळावा, मंदिर संरक्षित व्हावे यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न केले आहेत. हे मंदिर संरक्षित झाले तर पुरातन निर्मितीच्या ठेव्यातून पर्यटन विकास साधता येईल."

- शांताराम कांगणे, गोंदेगाव.

Shivlinga in Gondeshwar temple here. The second photo shows the cracks in the core of the temple.
Nashik News : निफाडला तमिळनाडूचा साबुदाणा दाखल; महाशिवरात्रीसाठी तालुकाभरात ग्राहकांची खरेदीसाठी पसंती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com