Ramzan Festival : मालेगावला दिवसाकाठी लाखभर नान फस्त! रमजान पर्वात बेकरी व्यवसायाला अच्छे दिन

Naan
Naanesakal

Ramzan Festival : रमजान पर्वात येथील बेकरी व्यवसाय वधारला असून या व्यवसायाला अच्छे दिन आले आहेत. रमजान पर्वातील मोठा पाव (नान) येथील मुख्य आकर्षण असतो. विशेष म्हणजे मुस्लीम बांधवांबरोबरच हिंदू बांधव देखील महिनाभर नानची चव चाखतात.

सध्या येथे दिवसाकाठी लाखभर नान विकले जात आहे. येथे नान लोकप्रिय असल्याने खारी, बटर, पाव, डोनेट आदी बेकरीमध्ये तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांची मागणी तात्पुरती घटली आहे. (Good day for bakery business during Ramzan Festival nashik news)

शहरात तीस वर्षांपासून रमजान पर्वात महिनाभर नान तयार होतो. वर्षातून महिनाभर मिळणारा नान बेकरींसह गल्ली-मोहल्ल्यात हातगाडी, किराणा दुकानांवर विकत मिळतो.

रमजान निमित्त शहरात २० पेक्षा अधिक ठिकाणी विशेष बाजार भरतात. विशेष बाजारांमध्ये ताजा नान खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडते. मुस्लीम बहुल असलेल्या पूर्व भागात शेकडो दुकानांवर नान मिळतो.

कॅम्प, संगमेश्‍वरच्या पश्‍चिम पट्ट्यातही मोसम चौक, सटाणा नाका, रामसेतू पुल, मोची कॉर्नर, रावळगाव नाका आदी भागात हातगाड्यांवर व बेकरींमध्ये नान विकला जातो. त्यामुळे येथील बेकरी व्यवसाय सध्या वधारला आहे.

रमजान पर्वात सकाळी उपवास सुरु होण्यापूर्वी मुस्लीम बांधव पहाटे भोजन करतात. भाकर, चपाती बरोबरच नान खाणे बहुसंख्य नागरिक पसंत करतात. दूध व चहाबरोबर नानचा स्वाद चाखला जातो. येथे सुमारे दीडशे बेकरींमधून नानचे उत्पादन घेतले जात आहे. चिमुरड्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वचजण महिनाभर आहारात नानचा वापर करतात.

शहरात हातगाड्या, दुध डेअरी, बेकरी, किराणा दुकान, तसेच विविध चौक, बाजारांमध्ये सुमारे तीन हजारावर दुकानांवर नानची विक्री केली जात आहे. नान तयार करण्यासाठी तूप, खोबरे, काजू, बदाम, खवा, गुलकंद, तीळ, दूध आदी पदार्थ वापरले जातात.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Naan
Ramzan Eid 2023 : फक्त डोळ्यांच्या पापणीनेही तुटू शकतो रोजा... नक्की काय म्हणतात मौलवी?

चार ते पाच प्रकारात मिळणारा नान वीस रुपयापासून ते पन्नास रुपयापर्यंत विकला जातो. यात तीनशे ग्रॅमपासून ते अर्धा किलोपर्यंत नान तयार होतो. साधा, खवा, पराठा आदी नानचे प्रकार आहेत. लहान मुले गुलकंद नानला पसंती देतात. येथील नान तालुक्यासह कसमादेत विक्रीसाठी जातो.

नानसाठी लागतो रोज १२ हजार किलो मैदा

रमजान पर्वात मैद्यापासून नान तयार केला जातो. त्यामुळे मैद्याची विक्रीत दुपटीने वाढ झाली आहे. एरवी येथे रोज पाच हजार किलो मैदा बेकरींमध्ये वापरला जातो. रमजान पर्वात रोज किमान दहा ते बारा हजार किलो मैद्याची विक्री होत आहे. गेल्या पंचवीस दिवसात येथे सुमारे तीनशे ते चारशे टन मैदा विकला गेल्याची माहिती व्यापारी दिनेश चौधरी यांनी दिली.

"मालेगावात बेकरींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नान तयार होतात. नवाब बेकरीमध्ये आमच्या आजोबांपासून नान तयार केला जातो. मालेगावचा नान सर्वदूर परिचित आहे. ग्राहकांचा प्रतिसाद असल्याने सर्वच बेकरींमधून नानचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते."

- हबीब शेख, संचालक, नवाब बेकरी, मालेगाव

Naan
Ramzan Festival : पावासामुळे ईदची खरेदी करणाऱ्यांची तारांबळ; खरेदी न झाल्याने व्यवसायांवर परिणाम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com