नाशिक : चोरट्यांकडून हस्तगत माल मूळ मालकांना केला परत

police action
police actionesakal

सिन्नर (जि. नाशिक) : चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आलेली चारचाकी, दुचाकी वाहने व मोबाईल फोन असा सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल वावी पोलिसांनी मूळ मालकांना परत केला. पोलिस दल स्थापना दिन अर्थात रायझिंग डे (Rising Day) सप्ताहानिमित्ताने सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांनी हा उपक्रम राबवला.

यांना मिळाल्या वस्तू परत...

जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे यांच्या आदेशाने व उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वावी पोलिसांनी कार्यक्षेत्रातील चोरीला गेलेल्या गाड्या व हरवलेल्या मोबाईलचा तपास करून चोरट्यांकडून परत मिळवले होते. रायझिंग डे सप्ताहानिमित्त या वस्तू मूळ मालकांना परत करण्यात आल्या. वावी येथील धनंजय दोडे यांची पाच लाख रुपये किंमतीची नवी कोरी इको कार (एमएच 15 एचएम 2067), निऱ्हाळे येथील दगडू काकड यांचा विवो कंपनीचा मोबाइल फोन, नांदुर-शिंगोटे येथील जोएब सय्यद यांचा एमआय कंपनीचा मोबाईल फोन, पाथरे येथील अनिल नरोडे यांचा रेडमी कंपनीचा मोबाईल फोन, मधुकर पठाडे (फुलेनगर) यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाइल फोन, मिरगाव येथील जयराम काळोखे यांची दुचाकी (एमएच १५ एचपी ३४५२) बजाज प्लेटिना, मच्छिंद्र जाधव यांची दुचाकी (एमएच १५, डीई ६६०२) ॲक्टिवा असा सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल परत करण्यात आला.

police action
संपादकांच्या लेखणीतून : एक होती एसटी... असं होऊ नये!

पोलिस उपनिरीक्षक विजय सोनवणे, हवालदार पंकज मोंढे, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब कांदळकर आदी उपस्थित होते. चोरीस गेलेल्या वस्तू सुस्थितीत परत मिळाल्याबद्दल मूळ मालकांनी पोलिसांचे आभार मानले.

police action
महानगरपालिका निवडणुकीत सन्मानपूर्वक आघाडीकरिता प्रयत्न ; छगन भुजबळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com