Railway Route
sakal
नाशिक: मध्य रेल्वेच्या नाशिक रोड ते भुसावळ रेल्वेमार्गावर गोरेवाडीदरम्यान क्रॉस होणारा आठ मीटरचा रस्ता आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आता १८ मीटरचा केला जाणार आहे. त्यासाठी रेल्वे मार्गाला सर्व्हिस रस्ता बांधला जाणार आहे. त्यासाठी मध्यवर्ती कारागृहाची दोन हजार ७१७ चौरस मीटर जागा महापालिकेला हस्तांतरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात आपत्कालीन स्थितीत भाविकांना रेल्वेस्थानकातून गोरेवाडी, जेल रोडमार्गे थेट दसकला गोदावरी नदीवर नेता येणे शक्य होणार आहे.