
NMC News: नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विकास आराखड्यातील त्रुटी दुरुस्त करण्याबरोबरच नाशिककरांची तयारी असल्यास नाशिक महापालिकेची हद्दवाढ करण्यास शासन सकारात्मक असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. (government is considering to increase limit of Nashik Municipal Corporation news)
आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी विधानसभेत एनएमआरडीए संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना सामंत यांनी माहिती दिली. १ मार्च २०१७ मध्ये नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एनएमआरडीए) स्थापना झाली. प्राधिकरणाच्या क्षेत्रातील नियोजनबद्ध विकास होण्यासाठी प्रदेशासाठीचा विकास आराखडा तयार केला जात आहे.
त्यासाठीच्या तांत्रिक बाबींच्या अनुषंगाने विकास योजना तयार करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला असून, मान्यतेसाठी शासनास सादर करण्यात आला आहे.
त्रुटी दूर करून शासन स्तरावरून त्वरित मंजुरी देण्याची कार्यवाही करण्यात येईल,अशी माहितीही त्यांनी दिली.
नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी पूर्णवेळ महानगर आयुक्त म्हणून भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. इतर अधिकारी आणि कर्मचारी यांचा आकृतिबंध मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आला असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. एनएमआरडीए संदर्भातील अडचणींच्या अनुषंगाने आमदार फरांदे यांनी विषय मांडला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.