
नाशिक : शासनाच्या नगरविकास विभागाने नगरपरिषदांच्या प्रभागरचनेचे वेळापत्रक घोषित केले आहे. मंगळवारपासून (ता.१७) प्रारूप प्रभागरचनेच्या कार्याला प्रारंभ होणार आहे. तर २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत अंतिम प्रभागरचना जाहीर करायची आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांमध्ये पुढील दोन महिने प्रभागरचनेची लगबग असणार आहे.