esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Dada Bhuse

आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे - दादा भुसे

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच नागरिकांचे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांनी खचून जावू नये, असा दिलासा राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिला आहे.


एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही

सरकारी विश्रामगृहात जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा श्री. भुसे यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. श्री. भुसे म्हणाले, की अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना लवकर मदत करण्यासाठी तत्काळ पंचानामे करण्यात यावेत. एकही नुकसानग्रस्त व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी.
सरकारी जमिनींवरील निवासाच्या उद्देशाने केलेली अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या प्रलंबित प्रस्तावांना गती देण्याबाबतची सूचना श्री. भुसे यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना केली. आरोग्य, रुरबन, जलजीवन मिशन योजनांचा आढावा श्री. भुसे यांनी घेतला.

हेही वाचा: आमदार सुहास कांदे यांच्यासोबतचा वाद मिटलाय? भुजबळांनी दिलं उत्तर

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्रकल्प संचालक उज्वला बावके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ आदी उपस्थित होते.

हेही वाचा: 'भुजबळ भाई विद्यापिठाचे विद्यार्थी नव्हे, प्राचार्य' : सुहास कांदे

loading image
go to top