Nashik News : वाइन उद्योगाकडून निर्णयाचे स्‍वागत; उद्योजकांना शासन निर्णयाची प्रतीक्षा

द्राक्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी वाइन उद्योगास प्रोत्‍साहन योजना पाच वर्षांसाठी राबविण्यासंदर्भात गुरुवारी (ता.४) मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.
wine grapes
wine grapesesakal

Nashik News : द्राक्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी वाइन उद्योगास प्रोत्‍साहन योजना पाच वर्षांसाठी राबविण्यासंदर्भात गुरुवारी (ता.४) मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.

त्‍याबद्दल वाइन उद्योगाकडून शासनाचे स्‍वागत केले असून, पुढील टप्यांत सविस्‍तर तपशील असलेल्‍या शासन निर्णयाची प्रतीक्षा राहणार असल्‍याची प्रतिक्रिया दिली आहे. (Government welcomed by wine industry nashik news)

माहिती व जनसंपर्क विभागातर्फे जारी केलेल्‍या पत्रकानुसार, राज्‍यातील द्राक्ष उत्‍पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी वाइन उद्योगास प्रोत्‍साहन योजना पाच वर्षांसाठी राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. कोरोना काळात २०२०-२१ मध्ये ही योजना बंद झाली होती. या योजनेत २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षात उद्योजकांनी व्‍हॅटचा भरणा केला आहे.

२०२३-२४ हे आर्थिक वर्ष संपण्यास कमी कालावधी शिल्‍लक असून योजना बंद होण्यापूर्वी निश्‍चित केलेल्‍या १६ टक्‍के प्रमाणे व्‍हॅटचा परतावा देण्यात येईल. राज्‍यातील द्राक्ष शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्‍साहन देणे, सुका मेवा बनविणे तसेच पर्यायी उत्‍पादनांची निर्मिती करण्यासाठी या वाइन उद्योगास प्रोत्‍साहन देणारी योजना सुरु केली आहे.

wine grapes
Nashik News: शाळकरी मुलाचा पतंग उडविताना मृत्यू; पाडळे गावावर शोककळा

ही योजना राज्‍यात वाइन उद्योग विकसित करण्यासाठीदेखील उपयुक्‍त ठरणार असल्यामुळे या योजनेस पाच वर्षांसाठी राबविण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

उद्योगाकडून निर्णयाचे स्‍वागत

निर्णयाविषयी ‘सुला’ विनियार्डस्‌चे वरिष्ठ उपाध्यक्ष मोनित ढवळे म्‍हणाले, की सर्वप्रथम आम्‍ही राज्‍य सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांचे आभार मानतो. निर्णयामुळे राज्‍यातील द्राक्ष उत्‍पादक शेतकरी व त्‍या द्राक्षांपासून वाइन उत्‍पादकांना चालना मिळेल.

आम्‍हाला मंत्रिमंडळाच्‍या निर्णयाची माहिती आहे. मात्र या टप्‍यावर भाष्य करणे आमच्‍यासाठी योग्‍य ठरणार नाही. पुढील मंत्रिमंडळ बैठकीत इतिवृत्त मंजूर करणे आवश्‍यक आहे. त्‍यानंतर शासन निर्णय जारी केला जाईल. त्‍यामध्ये निर्णयाचा तपशील नमूद असेल, त्‍यावेळी निवेदन जारी करणार असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले आहे.

wine grapes
Nashik News : शहरातील एकेरी मार्ग बनले ‘पुन्हा’ दुहेरी; पोलिसांच्या अनियमित कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com