नोकरी गमवलेल्या 'या' कामगारांना सरकार देणार निम्मा पगार? वाचा सविस्तर

Dr.-Karad-1.jpg
Dr.-Karad-1.jpg
Updated on

नाशिक : कोरोनाचे थैमान अन् लॉकडाऊन उद्योग, व्यावसाय, सार्वजनिक सेवा बंद होत्या. याकाळात अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमवल्या. ज्यांनी नोकरी गमावल्या अशा कामगारांना `ईएसआयसी` मार्फत तीन महिने आर्थिक सहाय्य मिळणार आहे, अशी माहिती `सीटू` संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॅा. डी. एल. कराड यांनी दिली. 

पाठपुराव्याला यश 

`सीटू`तर्फे सुरु असलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. लॉकडाऊनमुळे लाखो कामगारांनी आपला रोजगार गमवला. काहींना तर रोजच्या रोजीरोटीचा प्रश्न उभा होता. अशा बेरोजगार झालेल्या कामगारांना राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य देण्याची मागणी `सीटू`च्या वतीने देशाचे कामगार मंत्री संतोषी गंगवार यांच्याकडे 13 जून 2020 ला निवेदन व प्रत्यक्ष चर्चेत करण्यात आली होती. त्यानंतर `सीटू`च्या वतीने नाशिक जिल्ह्यातील नोकरी गमावलेल्या 572 कामगारांचे अर्ज अटल विमीत व्यक्ती कल्याण योजनेअंतर्गत ईएसआयच्या शाखेकडे सादर करण्यात आले होते. त्यांना आर्थिक सहाय्य देण्याची मागणी केली होती. यासंदर्भात `सीटू`ने राष्ट्रीय पातळीवर पाठपुरावा व आंदोलने केल्यानंतर 20 ऑगस्ट 2020 ला ईएसआयसी कार्पोरेशन समवेत ऑनलाइन व्हिडिओ बैठक झाली. या बैठकीत त्यावर निर्णय घेण्यात आला आहे. 

या निर्णयानुसार 21 मार्च ते 31 डिसेंबर 2020 या काळात 'ईएसआयसी'चे सभासद असलेला कामगार बेरोजगार झालेला असल्यास त्यास त्याच्या मागील सरासरी उत्पन्नाच्या पन्नास टक्के वेतन तीन महिने देण्यात येणार आहे. यासाठी हा कामगार ईएससायसीचा दोन वर्ष सभासद असला पाहिजे व त्याने कमीतकमी 78 दिवसाचे ईएसआयसी ची वर्गणी भरलेली असली पाहिजे. देशभरात 'ईएसआयसी'चे साडेतीन कोटी कामगार सदस्य आहेत. ज्या कामगारांचे वेतन दरमहा एकवीस हजाराहून कमी आहे, असे कामगार सदस्य असतात. सुमारे चाळीस लाख कामगारांना या योजनेचा फायदा मिळू शकतो.

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com