esakal | आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीचे राज्यपालांच्या हस्ते उदघाटन
sakal

बोलून बातमी शोधा

muhs inaugration.jpg

विद्यापीठात २५० कि.वॅ. क्षमतेचा सौरउर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. ऑपेक्स तत्वावर सुरू करण्यात आलेल्या सौरउर्जा प्रकल्पाव्दारे विद्यापीठाला वीज उपलब्ध होणार आहे. या प्रशासकिय इमारतीचे व सौरउर्जा प्रकल्पाचे राज्यपालांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीचे राज्यपालांच्या हस्ते उदघाटन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे नुतनीकरण करण्यात आलेल्या प्रशासकिय इमारतीचे व सौरउर्जा प्रकल्पाचे उदघाटन (ता.३) विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे प्र कुलपती अमित देशमुख, जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ,कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर, कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर आदी उपस्थित होते.उपस्थित होते.

२५० किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प

विद्यापीठात २५० कि.वॅ. क्षमतेचा सौरउर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. ऑपेक्स तत्वावर सुरू करण्यात आलेल्या सौरउर्जा प्रकल्पाव्दारे विद्यापीठाला वीज उपलब्ध होणार आहे. या प्रशासकिय इमारतीचे व सौरउर्जा प्रकल्पाचे राज्यपालांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या बाहेरील बाजूस मंडाना दगड बसवण्यात आले होते. हे दगड खिळखिळे होऊन अचानक निसटण्याचा धोका होता. त्यातून होणारा अपघात टाळण्यासाठी मंडाना दगड काढून बाहेरील बाजूस सिंमेटचा गिलावा करण्यात आला. पाणीगळती प्रतिबंधक कामे, रंगरंगोटी ही कामे करण्यात आली आहेत. तसेच विद्यापीठ परिसरात २५० किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. ॲपेक्स तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे विद्यापीठाला विनाशुल्क वीज उपलब्ध होणार आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे किशोर सुर्यवंशी इंटरनॅशनल स्कुल येथील हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी राज्यपालांचे पुष्प देऊन स्वागत केले. या स्वागताप्रसंगी पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु दिलीप म्हैसेकर,पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उपविभागीय अधिकारी संदीप आहेर उपस्थित होते.

loading image