Governor Ramesh Bais Nashik: राज्यपाल रमेश बैस मंगळवारी नाशिक दौऱ्यावर; जिल्हा परिषदेकडून जोरदार तयारी

Industries should take initiative for youth employment Governor Ramesh Bais
Industries should take initiative for youth employment Governor Ramesh Baissakal

Governer Ramesh Bais Nashik : राज्यपाल रमेश बैस मंगळवारी (ता. २१) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. इगतपुरी तालुक्यातील कुशेगाव व मोडाळे गावात त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याशिवाय, राज्यपाल बैस या वेळी शेतकऱ्यांशी संवाद साधतील.

विकसित भारत संकल्प यात्रा उपक्रमांतर्गत केंद्रीय योजनांचा आढावा या वेळी घेतला जाणार आहे. राज्यपाल यांच्या दौऱ्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू झाली. शनिवारी (ता. १८) शासकीय सुटी असतानाही कामकाज सुरू होते. (Governor Ramesh Bais on Nashik visit on 21 nov news)

विकसित भारत संकल्प यात्रा उपक्रमाचा प्रारंभ नंदुरबार येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्यपाल बैस यांच्या उपस्थितीत झाला. संकल्प यात्रा जिल्ह्यातील सहा तालुक्यांत १४ ते २२ नोव्हेंबरदरम्यान काढली जाईल. या उपक्रमांतर्गत ग्रामस्तरावरील योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करण्यात येते. सध्या महापालिका आणि जिल्हा परिषदांवर प्रशासकीय राज आहे.

अशा स्थितीत योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचतोय किंवा नाही, याबाबतची माहिती घेतली जाणार असून, विविध शासकीय योजनांची जगजागृती करण्यात येईल. या यात्रेचा प्रारंभ नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातील ननाशी गावात पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झाला. ज्या जिल्ह्यांत यात्रेचा रथ फिरणार आहे, त्या जिल्ह्यांना राज्यपाल भेट देणार आहेत.

त्यानुसार राज्यपाल बैस यांचा दौरा आहे. इगतपुरी तालुक्यातील कुशेगाव व मोडाळे ग्रामपंचायतींत राज्यपाल बैस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. कुशेगाव येथे नॅनो युरियाचे प्रात्यक्षिक केले जाणार आहे. या वेळी राज्यपाल बैस शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्यांच्या हस्ते येथे लाभार्थ्यांना सायकलींचे वाटप होईल.

Industries should take initiative for youth employment Governor Ramesh Bais
Governor Ramesh Bais : निलम गोऱ्हे यांचे पुस्तक म्हणजे संघर्षशील महिलांची कहाणी

मोडाळे गावात बचत गटाच्या महिलांनी बनविलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाला राज्यपाल बैस भेट देतील. केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या लावण्यात आलेल्या स्टॉलला ते भेट देतील. त्यानंतर राज्यपाल बैस, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री भुसे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल.

या दौऱ्याची जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेकडून तयारी सुरू झाली आहे. यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) वर्षा फडोळ यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, नोडल अधिकारी फडोळ यांनी गावांना भेट देत तयारीचा आढावा घेतला.

गटविकास अधिकारीपदाचा पदभार पाटील यांच्याकडे

इगतपुरी तालुका गटविकास अधिकाऱ्यांची बदली झालेली असल्याने हे पद रिक्त होते. राज्यपाल दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे. पदभार घेतल्यावर पाटील यांनी लागलीच गावांमध्ये जाऊन बैठका घेत तयारी सुरू केली.

Industries should take initiative for youth employment Governor Ramesh Bais
Governor Ramesh Bais : उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची प्रगती निश्‍चित : राज्यपाल रमेश बैस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com