Nashik News : जीपीओ रस्त्याने टाकली कात; तब्बल 2 वर्षानंतर रस्ता झाला खड्डेमुक्त! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pothole free road by asphalting from GPO to Ganjmal signal

Nashik News : जीपीओ रस्त्याने टाकली कात; तब्बल 2 वर्षानंतर रस्ता झाला खड्डेमुक्त!

जुने नाशिक : जीपीओ ते गंजमाळ सिग्नलपर्यंतचा रस्ता गेल्या दोन वर्षापासून खड्डेमय झाला होता. यंदा मात्र संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण केल्याने रस्त्याने कात टाकली आहे. (GPO road After almost 2 years road became pothole free Nashik News)

जीपीओ रोडला मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे हे समजणे अवघड झाले होते. त्यामुळे अनेक अपघात झाले. यंदा पावसाळ्यात रस्त्याची अधिकच बिकट अवस्था झाली.

नाशिककरांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. केवळ पावसाळ्यातच नव्हे तर गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला होता. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वारंवार होत असूनही महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात होते.

उशिरा का होईना महापालिकेकडून नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली. काही दिवसांपूर्वी रस्त्याची डागडुजी न करता संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे दोन वर्षानंतर संबंधित रस्ता खड्डेमुक्त झाल्याचा अनुभव परिसरातील नागरिक तसेच वाहनचालकांना आला.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: Nashik News : गौण खनिजविषयी अधिकार पुन्हा अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे!

त्यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात आले. इतर रस्त्यांचेदेखील अशाच प्रकारे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणीही नागरिकांनी केली.

सिग्नल चौक मात्र दुर्लक्षित

जीपीओ ते गंजमाळ सिग्नलपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येऊन रस्ता खड्डेमुक्त करण्यात आला. मात्र सिग्नल चौकाकडे दुर्लक्ष झाले. आजही चौकाची प्रचंड दुरवस्था झालेली दिसून येत आहे.

मोठ दगड रस्त्यावर पसरलेले आहे. ठिकठिकाणी खड्डे दिसत आहे. वाहनचालकांची अडचण होत आहे. रस्त्याप्रमाणे चौकाचेही डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली.

हेही वाचा: Nashik ZP News : मंजूर 242 कोटी अन् नियोजन 260 कोटींचे!