Nashik News| शासकीय कामकाजात ग्रामगीता आदर्शवत्‌ : NMC आयुक्त डॉ. पुलकुंडवार; ग्रामगीताचे केले सादरीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC Commissioner Dr. Pulkundwar

Nashik News| शासकीय कामकाजात ग्रामगीता आदर्शवत्‌ : NMC आयुक्त डॉ. पुलकुंडवार; ग्रामगीताचे केले सादरीकरण

नाशिक : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ग्रामगीता हा ग्रंथ जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारा आहे. हागणदारीमुक्त, स्वच्छ भारत मिशन, तंटामुक्त अभियान, साथरोग निमुर्लन यासारखे अभियान हे ग्रामगीतेवर आधारित आहेत.

सर्वत्र उपलब्ध असलेल्या या ग्रथांचा दुर्दैवाने विदर्भातले दोन विभाग व मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता बाहेर प्रसार झालेला नाही, अशी खंत महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केली. मराठी भाषा गौरव दिनी प्रत्येकाने आपल्या भागामध्ये, कार्यालयांमध्ये, तसेच आपल्या घरामध्ये ग्रामगीता ठेवावी असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक महापालिका, सार्वजनिक वाचनालय, कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्यातर्फे सोमवारी (ता. २७) महाकवी कालीदास कलामंदिरात मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम झाला.

त्यावेळी डॉ. पुलकुंडवार यांनी संत तुकडोजी महाराज यांच्या ‘ग्रामगीता’मधील ओव्यांचे वाचन करुन त्यावर भाष्य केले. घरोघरी ग्रामगीतेचे वाचन करुन, तसे आचरण करण्याचे आवाहन आयुक्तांनी या वेळी केले. (Gram Gita ideal in government work Grama Geeta performed by NMC Commissioner Dr Pulkundwar Nashik News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

ते म्हणाले, की भारतीय संविधान आणि ग्रामगीता ही दोन पुस्तके वारंवार वाचली पाहिजेत. ग्रामगीतेत सोप्या भाषेत स्वच्छता, शिक्षण, वृक्षारोपण, साथरोग निर्मूलन, निवडणुका, आदर्श नेता, मतदारसंघाची जबाबदारी, स्त्री सन्मान, स्त्री शिक्षण, ग्रामआरोग्य, सर्वधर्मसमभाव, ग्रामनिर्माण कला, तंटामुक्ती अशा सर्व घटकांवर प्रभावी भाष्य आहे. जुजबी शालेय शिक्षण घेतलेले तुकडोजी महाराज अमरावतीचे होते. सर्व मानवांचा देव एकच, असे मार्गदर्शन करतानाच एकेका ओवीतून मानवी जिवनाला स्पर्श करणाऱ्या सर्व बाबींवर महाराज उपदेश करतात.

हाच धागा पकडत सध्याच्या समस्येवर ग्रामगीतामध्ये उत्तर असल्याचे डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले. ग्रामगीता प्रसिद्ध होण्याच्या अनेक वर्षापूर्वी तुकडोजी महाराज गावोगावी जाऊन कीर्तन करायचे. अंभागांतून गावातल्या प्रत्येक नागरिकांनी गावाच्या उन्नतीसाठी भिजले पाहिजे, कष्ट केले पाहिजे आणि गावाच्या उन्नतीचे श्रेय घेतला पाहिजे असे सांगत होते.

आपणही लोकसहभाग, लोकचळवळ राबवा असे सांगत याच तत्वज्ञानाचा अवलंब करत असल्याचे पुलकुंडवार यांनी सांगितले. हा ग्रंथ प्रत्येक कार्यालयात आदर्श काम करण्यासाठी उपयोगी असल्याचेही त्यांनी नमुद केले. ‘पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करु नका’ या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या काव्याने कार्यक्रमाचा समारोप झाला.

टॅग्स :Nashik