Nashik Crime News : ग्रामपंचायत निवडणूक वादातून टोकडेत हाणामारी

beating
beatingesakal

मालेगाव (जि. नाशिक) : टोकडे (ता. मालेगाव) येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून दोन गटात जोरदार हाणामारी झाली. विजयी मिरवणूक सुरु असतानाच दोन गटात बाचाबाची झाली, त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. दगडफेक झाल्याने गावात पळापळ सुरु झाली. हाणामारीत दोघा गटातील मयूर द्यानद्यान, दीपक दाभाडे आदींसह चार जण जखमी झाले. गावात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. (Gram panchayat election dispute leads to clashes Nashik Crime News)

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

beating
Nashik Political News: शिंदे गटाचे शिष्टमंडळ आयुक्तांच्या दारी; अवाजवी मालमत्ता कर कमी करण्याची मागणी

थेट सरपंचपदाचे भाजपचे विजयी उमेदवार कैलास दाभाडे व पराभूत उमेदवारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. श्री. दाभाडे यांनी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य दादाजी शेजवळ यांच्या समर्थक माल्हणबाई सोनवणे यांचा पराभव केला. निवडणूक निकालानंतर गावात दाभाडे व समर्थकांची विजयी मिरवणूक सुरु असतानाच हाणामारीचा हा प्रकार घडला.

माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक विशाल पाटील, मोहीत मोरे आदी व पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पोहोचल्यानंतर त्यांनी जमाव पांगविला. तुर्त गावात तणावपूर्ण शांतता आहे.

beating
Nashik Crime News : कार पंक्चर करून साडेसात लाखांची रोकड लांबविली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com