Gram Panchayat Election : गाव कारभाऱ्यांच्या निवडणुकीत हायटेक प्रचार!

gram panchayat election news
gram panchayat election newsesakal

विकास गामणे , सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा आखाडा आरोप- प्रत्यारोपांच्या धुरळ्याने चांगलाच रंगू लागला आहे. बदलत्या वातावरणातही प्रचाराचा ज्वर तापला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत वापरली जाणारी हायटेक प्रचार यंत्रणा गावपातळीवर राबविली जात आहे. यात गीते, ऑडिओ, व्हिडीओ, व्हॉट्स अॅप इमेज उमेदवाराचा आवाज मतदारांपर्यंत पोहोचवला जात आहेत. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत तरुण उमेदवारांची संख्या जास्त आहे.

तरुणाई निवडणुकीत उतरलेली असल्याने हायटेक प्रचारावर भर दिला जात आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी 'हक्क मताचा बजावू या, विकासाला निवडू या, 'आला रं आला वासुदेव आला', 'मागं हटायचं न्हाय, आता लढायचं हाय' अशा विविध गीतांमधून उमेदवार मतदारांना साकडे घालताना दिसत आहे. (Gram Panchayat Election Hitech campaign in election of village officials Nashik news)

जिल्ह्यात १९६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. गावपुढारी निवडण्यासाठी रविवारी (ता.१८) मतदान होत आहे. शुक्रवारी (ता.१६) सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडविणार आहे. त्यामुळे जाहीर प्रचारासाठी उमेदवारांकडे आता केवळ दोन-तीन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. आपलंच नाणं कसं खणखणीत आहे, हे तसेच केलेल्या विकास कामांचे, सांगण्यासाठी उमेदवार जिवाचे रान करीत आहेत.

रोज वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप इमेजेस तयार करून त्या व्हॉट्सअॅपवर पाठविणे, आपल्या कार्यकर्त्यांना त्यांचेच स्टेटस ठेवण्यास सांगणे, प्रचार गीत तयार करून ते मतदारांना पाठविणे, प्रचाराच्या वेगवेगळ्या ऑडिओ क्लिप तसेच केलेल्या विकासकामांचे व्हीडोओ तयार करून मतदारांना पाठविणे अशा डिजिटल प्रचारासाठी अनेक उमेदवारांनी स्वतंत्र टिमच कार्यरत केली आहे. या टिमने वॉर्डनिहाय मतदारांचे ग्रुप तयार केले आहेत. एक मतदार दोन-तीन उमेदवारांच्या ग्रुपमध्ये दिसून येत आहे. प्रत्येक उमेदवार दिवसभरातील प्रचाराचे छायाचित्र, व्हिडिओ ग्रुपवर टाकतात. त्यामुळे मतदारांचे व्हॉट्सअॅपही निवडणुकीच्या मॅसेजने ओसंडून वाहत आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

gram panchayat election news
Sarangkheda Horse Market : सारंगखेडा अश्वबाजारात उज्जैनचा शेरा खातोय भाव..!

असे करा मतदान!

काही उमेदवारांकडून मतदान कसे करावे, याचेही व्हिडीओ तयार करून ते मतदारांपर्यंत पोहोचविले जात आहेत. उमेदवाराचे नाव, चिन्ह टाकून कोणत्या पसंती क्रमांकाचे बटण दाबायचे, याचे मार्गदर्शन या व्हिडीओमधून करण्यात येत आहे. त्यामुळे मतदार साक्षरतेचा उपक्रम राबवूनही काही उमेदवार आपला प्रचाराचा हेतू साध्य करीत आहेत.

प्रचारासाठी थेट बांधावर

एरव्ही कोणाच्या सुख-दुःखात न दिसणारेही आता थेट शेतक-यांच्या बांधावर, गुराख्यांमागे डोंगरावर पोहोचत आहेत. कामानिमित्त बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांची घरे शोधून थेट त्यांच्यापर्यंतही उमेदवार पोहोचत आहेत. काहीही झाले, तर मागे हटायचं नाही. समोर कोणताही उमेदवार असो, पूर्ण ताकदीने लढायचं, अशा निर्धाराने प्रचाराची एकही संधी उमेदवारांकडून सोडली जात नाही.

प्रचार गीतांचे स्टेटस

अनेक उमेदवारांनी आपल्या प्रचारासाठी विविध हिंदी, मराठी गीतांवर आधारित प्रचार गीते तयार केली आहेत. या गीतांचे स्टेटस उमेदवार आणि त्याचे कार्यकर्ते आपल्या व्हॉट्सअॅपवर ठेवून डिजिटल प्रचारावर भर देत आहेत.

gram panchayat election news
Nashik News : नासाकाकडून उसाला चोवीसशेचा भाव; जिल्ह्यातील सर्वाधिक दर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com