Nashik News : नासाकाकडून उसाला चोवीसशेचा भाव; जिल्ह्यातील सर्वाधिक दर

suagrcane
suagrcaneesakal

नाशिक : मे दीपक बिल्डर ॲन्ड डेव्हलपर्स नाशिकरोड संचलित नाशिक सहकारी साखर कारखान्याने २०२२- २३ या हंगामात उसाला २४०१ रुपये प्रति मेट्रिक टन भाव जाहीर केला. पहिल्या पंधरवड्याचे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. सध्याचा हा जिल्ह्यातील सर्वाधिक दर आहे. (price of twenty four hundred for sugarcane from Nasaka Highest rates in district Nashik Latest Marathi News)

तब्बल नऊ वर्ष बंद असलेला हा कारखाना चालू गळीत हंगामात सुरू झाला आहे. त्यामुळे नाशिक, सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यातील ऊस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. सुरुवातीला कारखान्याच्या यंत्रसामग्रीत अडचणी निर्माण झाल्या, मात्र त्यावर मात करत सध्या कारखाना सुरळीतपणे चालू आहे.

कारखान्यास उसाचा अधिकचा पुरवठा व्हावा त्यासाठी व्यवस्थापनाने ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेला प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर केलेले आहे. कारखान्याचे चालू गळीत हंगामात ३. ५० लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठरविलेले आहे. ते साध्य करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहेत. यासाठी शेतकरी, कामगार, ऊसतोड व वाहतूक यंत्रणा यांचेदेखील सहकार्य मोलाचे आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

suagrcane
Nashik News : गडकरींच्या हस्ते रविवारी इगतपुरीत 1830 कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण

कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी ऊस इतर कारखान्याकडे न देता नासाकाला देऊन उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे. कारखान्याचा हा पहिलाच गळीत हंगाम असून कारखान्याने आर्थिक नफा- तोट्याचा विचार न करता ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हिताचा विचार करून नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक दर जाहीर केला आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत- जास्त ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष खासदार हेमंत गोडसे, संचालक दीपक चंदे, शेरझाद पटेल, सागर गोडसे, कार्यकारी संचालक सुकदेव शेटे आदींनी केले आहे.

suagrcane
Sarangkheda Horse Market : सारंगखेडा अश्वबाजारात उज्जैनचा शेरा खातोय भाव..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com