Gram Panchayat Election : देवळ्यात तरुणांकडे गावकारभाऱ्याच्या चाव्या!

Sarpanch Chandrakant Aher and his supporters cheering after winning the village panchayat elections in Satwaiwadi (Devla).
Sarpanch Chandrakant Aher and his supporters cheering after winning the village panchayat elections in Satwaiwadi (Devla).esakal

देवळा (जि. नाशिक) : तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत दहा ग्रामपंचायतींमध्ये भाजपने मुसंडी मारत आपले प्राबल्य दाखवून दिले. इतर तीन गावात राष्ट्रवादी व अपक्ष उमेदवारांनी वर्चस्व राखले. विशेष म्हणजे बहुतांश गावात युवा वर्गाच्या नेतृत्वास मतदारांनी साथ देत त्यांना विजयश्री बहाल केली. (Gram Panchayat Election youths won election at deola nashik news)

तालुक्यातील १३ ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी मंगळवार (ता.२०) येथील प्रशासकीय कार्यालयात झाली. मटाणे व भऊर येथील सरपंचपद आधीच बिनविरोध झालेली असल्याने इतर ११ गावांच्या सरपंचपदासाठी ३० उमेदवारांची तर फुलेनगर येथील सर्व सदस्यांची निवड बिनविरोध झाल्याने उरलेल्या १२ गावांतील ७७ सदस्यांसाठी १६१ उमेदवारांची मतमोजणी येथे झाली.

विठेवाडी, कणकापूर, वाजगाव, सटवाईवाडी, खामखेडा अशा काही ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या. चिंचवे येथे राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद यश मिळवले. तर दहिवड येथे अपक्ष उमेदवार सरपंच म्हणून निवडून आले. मटाणे येथे बिनविरोध निवड करत स्थानिक विकास आघाडी यशस्वी ठरली.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

Sarpanch Chandrakant Aher and his supporters cheering after winning the village panchayat elections in Satwaiwadi (Devla).
Gram Panchayat Election Result : सिन्नरला ग्रामपंचायत निवडणुकीत वाजे गटाचा डंका!

गावनिहाय नवनिर्वाचित उमेदवार व कंसात मिळालेली मते : दहिवड - सरपंच - पुष्पा पवार (२१७२) , सदस्य - केदा गायकवाड (३२७), आशा पिंपळसे (३४१), राजाराम ठाकरे (६०९), दिगंबर वाघ ( ४९०), गुंताबाई सोनवणे (२६०), सुनील अहिरराव (३९४), सुनंदा ठाकरे ( ३७७), सुनंदा ठाकरे (२८७). फुलेनगर : सरपंच - निंबा भिला अहिरे (३६९);

वासोळ : थेट सरपंच - स्वप्नील अहिरे (१२१०), सदस्य - भारत अहिरे (३४२), अनसूयाबाई अहिरे (३५२), अलकाबाई पगार (३७३), मंगळ महिरे (४११), संजय खुरसाने (४१३), दरबारसिंग गिरासे (४१९), इंदूबाई केदारे (४४९). भऊर : सरपंच (बिनविरोध); सदस्य - सुनीता पवार (३४४), रवींद्र पवार (५२४ ), सीमा गरुड (४२९), काशिनाथ पवार (२७९), ज्योती दीपक (३५२). खामखेडा : थेट सरपंच - वैभव धर्मा पवार (१५३३ ), सदस्य- गणेश शेवाळे (४०९), रेखा पवार (४६४), सुशीला शेवाळे (४४४), अंबर सोनवणे (४६३), ज्योती सोजळ (५१०), विमलबाई मोरे (४५२), रामचंद्र बोरसे (५९३), श्रावण बोरसे (५५८),

मटाने : अनिता दीपक आहिरे (१४९). विठेवाडी : सरपंच- नानाजी पवार (१०९६), सदस्य- भाऊसाहेब पवार (२३८), सुनंदा सोनवणे (२७९), केवळ पवार (३३०), भारती पवार (३४०), इंदूबाई निकम (३८४), बापू जाधव (३५६), राहुल निकम (३४४), पल्लवी बोरसे(३०१), ईश्वर निकम (२८७), सयाबाई गांगुर्डे (३०७), सीताबाई पवार ( २८५). डोंगरगाव : थेट सरपंच - पौर्णिमा सावंत (७९५), सदस्य - कृष्णाजी सावंत ( ३४९), वाजगाव : सरपंच -सिंधूबाई सोनवणे (११७९), सदस्य- ज्ञानेश्वर शिंदे (३३८),

मोतीलाल सोनवणे (३५१), मंजुळा जाधव (३५९), साहेबराव मोरे (२९३), पुष्पा वाघ (२९४), रवींद्र मोरे (३३०), मंदाकिनी देवरे (३२३), सुनील देवरे (३०८), धनश्री ढवळे (३४१), लक्ष्मीबाई मोरे (३२६). कनकापूर : सरपंच - बारकू वाघ (६३४) सदस्य - किरण गांगुर्डे (२३८), बिबाबाई बच्छाव (२५२), अनुराधा जैन ( ३२१), जगदीश शिंदे (२१७), सुशीलाबाई पवार (२५३), बिजलाबाई बर्डे (१७२), पांडुरंग पिंपळसे (२२४), गोविंद बर्वे (२६९) जिजाबाई मोरे (२३७), श्रीरामपूर : सरपंच - लीलाबाई पवार (६५२), सदस्य - साहेबराव पवार (२५४), जगदीश निकम (२६७), वंदना निकम (२९७), लाला पवार (२७६) प्रशांत निकम (२९६),

सटवाईवाडी : सरपंच - चंद्रकांत आहेर (६७६ ), सदस्य- शांताराम भालेराव (३२३), मनीषा वाघ (२८०), अंजनाबाई सोनवणे (२५६), सोनाली आहेर (३०४). चिंचवे : सरपंच -वैशाली पवार (९९३), सदस्य - बायजाबाई पवार (४७५), शीतल पवार (३६६), भाऊसाहेब पवार ( ३१७) , उज्ज्वला गांगुर्डे (४७९).

Sarpanch Chandrakant Aher and his supporters cheering after winning the village panchayat elections in Satwaiwadi (Devla).
Nashik Cyber Crime : अश्‍लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेलिंग; महिलांची खास टोळी सक्रिय!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com