नाशिक: जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील (पेसा क्षेत्राबाहेरील) ८१० ग्रामपंचायतींमध्ये सोमवारी (ता. २८) सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. अनेक गावांमधील आरक्षण बदलल्याने इच्छुकांना धक्का बसला आहे. .शासनाच्या आदेशानुसार राज्यभरात मार्चमध्ये सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आली. २०२५ ते २०३० या कालावधीसाठी ही प्रक्रिया राबविली गेली. मात्र या प्रक्रियेत त्रुटी असल्याने काही इच्छुकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या प्रकरणात फेरआरक्षण सोडत काढावी, असे निर्देश होते. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्याच्या ग्रामविकास विभागाने अनुसूचित जाती-जमाती तसेच नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षण काढावे, अशा सूचना केल्या होत्या..जिल्ह्यातील पेसा क्षेत्राबाहेरील ८१० ग्रामपंचायतींमध्ये सोमवारी (ता. २८) एकाच दिवशी सरपंच पदासाठी आरक्षण प्रक्रिया पार पडली. तहसीलदारांनी राबविलेल्या प्रक्रियेत काही गावांमध्ये यापूर्वीच्या आरक्षणात बदल झाले आहेत. त्यामध्ये राखीव जागा खुल्या प्रवर्गासाठी सुटल्या तसेच काही गावांमध्ये खुल्या जागेवर आरक्षण निघाले. त्यामुळे यापूर्वीच्या आरक्षणानुसार सरपंचपदासाठी तयारी करणाऱ्या इच्छुकांच्या अपेक्षांना सुरुंग लागल्याने ‘कही खुशी, कही गम’ असे चित्र पाहायला मिळत आहे..महिला आरक्षण सोडत उद्याजिल्ह्यात सरपंच आरक्षण सोडत निघाल्यानंतर आता साऱ्यांच्याच नजरा महिला राखीव जागांकडे लागल्या आहेत. बुधवारी (ता. ३०) अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) ५७७ तसेच अनुसूचित क्षेत्राबाहेरील ८०९ अशा एकूण एक हजार ३८६ ग्रामपंचायतींमध्ये महिला आरक्षणानुसार ५० टक्के जागा राखीव केल्या जाणार आहेत. पुढील पाच वर्षे कोणत्या गावांमध्ये महिलाराज येणार, यावरून जनतेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे..Kolhapur Kabaddi Player Accident : कबड्डीपटूच्या अंगावरून थेट ट्रकचे चाक गेलं, पोलिस होण्याचे स्वप्न भंगल; ट्रेकींगला जाताना अपघात.सरपंच आरक्षण सोडतएकूण ग्रामपंचायती- ८१०अनुसूचित जाती- ५४अनुसूचित जमाती- १०७नागरिकांचा मागास प्रवर्ग- २१८खुला- ४३१.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.