नाशिक: जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या वादग्रस्त ठरलेल्या बदल्यांबाबत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महासंघाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नाशिकच्या औद्योगिक न्यायालयात यापूर्वीच याचिका दाखल असल्याने आता या बदल्यांचा निर्णय न्यायालयाच्या कक्षेत गेला.