#Lockdown : 'लॉकडाउन'नंतरही अनेकजण करताय सूचनांकडे कानाडोळा!...'या' गावाने लढविली अशी शक्कल

senior citizen.png
senior citizen.png
Updated on

नाशिक : (वाडीवऱ्हे) सध्या जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी सध्या शासकीय यंत्रणेसह सर्वच सामाजिक संस्थांकडूनही विविध सूचना देण्याबरोबरच उपाययोजनाही राबविल्या जात आहेत. देशभर "लॉकडाउन'नंतरही अनेक जण सूचनांकडे कानाडोळा करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर वाडीवऱ्हे (ता. इगतपुरी) ग्रामपंचायतीने एक अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोरोना संक्रमणाच्या काळात गावातील जे ज्येष्ठ नागरिक घरातच राहतील त्यांना मानधन देण्यात येणार आहे. 

प्रोत्साहनपर मानधन देण्यात येणार

कोरोना विषाणूपासून सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिकांनाच पोहचतोय. असे असतांनाही अनेक ज्येष्ठ नागरिक काही ना काही कामानिमित्त घरातून बाहेर पडतच असतात. त्यामुळे ज्येष्ठांनी घराबाहेर पडू नये, यासाठी वाडीवऱ्हे ग्रामपंचायतीतर्फे त्यांना शासकीय नियमांचे पालन करून घरातच राहिल्यास दीड ते दोन हजार रुपयांचे प्रोत्साहनपर मानधन देण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून परिस्थितीनुसार पहिले तीन ते चार महिने हे मानधन देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. गावात ज्येष्ठ नागरिकांची संख्या साधारणतः एक हजार आहे. त्यापैकी नियमांचे पालन करत घरातच थांबणाऱ्या ज्येष्ठ नागरिकच या मानधनास पात्र ठरणार आहेत. सरपंच रोहिदास कातोरे, उपसरपंच प्रवीण मालुंजकर, ग्रामविकास अधिकारी व सर्व सदस्यांनी हा निर्णय घेतला. याबाबत घंटागाडीतून ध्वनिक्षेपकाद्वारे माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीतर्फे गावात जंतुनाशक औषधाची फवारणीही करण्यात आली आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी रोज गावात फिरून ग्रामस्थांमध्ये शासकीय सूचनांबाबत प्रबोधन करीत आहेत. सोशल डिस्टन्स पाळा, हात वारंवार धुवा, तोंडाला रुमाल किंवा मास्क लावा आदींबाबत जनजागृती करण्यात येत आहे. 

गावात सर्वेक्षण सुरू 

मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या वाडीवऱ्हे गावात साधारणतः एक हजार ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांचे सर्वेक्षण सध्या सुरू असून, ग्रामपंचायतीतर्फे त्यांचे आधारकार्ड, ओळखपत्र आदी माहिती संकलित केली जात आहे. त्यानंतर पात्र ज्येष्ठ नागरिकांना मानधन देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येणार आहे. सध्या फक्त जनजागृती आणि सर्वेक्षणाचे काम सुरू असून, उपक्रमास नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

वाडीवऱ्हे गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी घरात बसून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. जे ज्येष्ठ नागरिक शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करतील, त्यांना मानधनदेखील देण्यात येणार आहे. आपल्या सेवेत असलेले पोलिस कर्मचारी, आरोग्याधिकारी यांना सहकार्य करावे. - रोहिदास कातोरे, सरपंच, वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com