shri jagdamba mata wani
sakal
वणी (नाशिक) - श्री सप्तशृंगी मातेची मोठी बहीण समजली जाणाऱ्या व नवसाला पावणारी अशी अख्यायीका असलेल्या येथील जगदंबा मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवास सोमवार ता. २२ पासून उत्साहात प्रारंभ होत असून नवरात्रोत्सवात जगंदबा मंदीरात सुमारे दीड हजारावर महिला भावीक नऊ दिवस घटी बसणार आहे. तसेच ट्रस्टच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी श्री सप्तशृंगी देवी ट्रस्ट व प्रशासन यंत्रना सज्ज झाली आहे.