Nashik News: हरवलेलं नात गवसले, पण दीड वर्षांनंतर... नातवाने शोधली वर्षापूर्वी हरवलेली आजी

तब्बल वर्षापूर्वी एक मनोरुग्ण आजी मालेगावहून प्रवासादरम्यान मनमाडला चुकीच्या रेल्वेतून थेट वेल्लूर (तमिळनाडू) येथे उतरतात.
Grandmother and grandson met again on Monday in Nagar Quail Railway.
Grandmother and grandson met again on Monday in Nagar Quail Railway.

Nashik News : तब्बल वर्षापूर्वी एक मनोरुग्ण आजी मालेगावहून प्रवासादरम्यान मनमाडला चुकीच्या रेल्वेतून थेट वेल्लूर (तमिळनाडू) येथे उतरतात. मराठीशिवाय कुठलीही भाषा येत नसल्याने तेथेच एका वृद्धाश्रमात त्या राहतात आणि वर्षानंतर त्यांचा नातू आजीला शोधून पुन्हा मालेगावला घेऊन जातो, असा अनोखा घटनाक्रम सोमवारी (ता. २७) नागर क्वाईल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल एक्स्प्रेसमध्ये उघडकीस आला.

या पुन्हा भेटलेल्या कुटुंबातील आजी आणि नातवाने ‘सकाळ’ प्रतिनिधीला आपबीती सांगितली. (grandson found lost Grandmother after one and half year nashik news)

श्रीरामनगर (मालेगाव) येथील चार क्रमांक गल्लीत सखूबाई सीताराम फासगे (वय ७०) या मालेगाव पालिकेतील निवृत्त महिला कर्मचारी राहतात. साधारण वर्षापूर्वी त्या मनमाडला रेल्वेने जात असताना चुकीच्या गाडीत बसल्याने थेट वेल्लूर येथे पोचल्या. तेथे निराश्रितपणे वावरत असल्याचे तेथे एका कुटुंबाच्या लक्षात आल्याने पाच-सहा दिवस ते तिची काळजी घेत हे कुटुंब आजीला तेथील वृद्धाश्रमात दाखल करतात.

वेल्लूर येथील युनायटेड व्हॅलेंटरी सर्व्हिस सोसायटी या संस्थेच्या वृद्धाश्रमात त्यांच्या कुटुंबाचा शोध घेण्याचा प्रयत्न होतो, मात्र आजी मराठीत मोजके बोलत असल्याने बोध होत नाही. अखेर तेथील वृद्धाश्रमात कार्यरत चालक मरियम दास यांची मुलगी पुण्यात जॉबला असल्याने तिला वेल्लूरला बोलावून घेत आजीच्या माहितीची खातरजमा केली जाते. मात्र त्यात छत्रपती संभाजीनगर आणि आजीचे नाव, एवढाच संदर्भ लागतो.

Grandmother and grandson met again on Monday in Nagar Quail Railway.
Inspirational News: अब्बासभाई कलमूवाले देताहेत गरजूंना मोफत अन्नसेवा! सायकलवर प्रवास करत राबवताहेत उपक्रम

मरियम दास यांच्या मुलीच्या माहितीवरून चिलप्पा दास या महाराष्ट्रातील माहिती असलेल्या व्यक्तीची मदत घेऊन ते छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या परिचित व्यक्तींपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतात.

नगरसेवकांची शिष्टाई

आजीच्या नातेवाइकांच्या शोधमोहिमेत ही माहिती मालेगाव येथील भाजपचे माजी नगरसेवक नितीन फोकळे यांच्यापर्यंत पोचते. ते मनपा आयुक्तांमार्फत प्रयत्न करतात. या सगळ्या प्रयत्नात एका व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर ही माहिती येते तेव्हा आजीचा नातू आणि मालेगाव मनपा कर्मचारी सागर अशोक फासगे, नातजावई राजू बोरसे यांनी दोन दिवसांपूर्वी वेल्लूर येथे जाऊन आजी ओळखली. त्रस्त आजीने दोघांना मिठी मारून अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

पत्ता अन् गफलत

आजी चुकल्या तेव्हा त्या त्यांची मुलगी छत्रपती संभाजीनगर राहत असल्याने तिकडे जात होत्या तेव्हा चुकीच्या गाडीत बसल्या असाव्यात; मात्र त्या सगळीकडे ‘औरंगाबाद’ एवढेच सांगत असल्याने तब्बल वर्षभरापासून त्यांच्या नातेवाइकांचा शोध सुरू होता. अखेर आज हा शोध संपला. नागर क्वाइल रेल्वेत सोमवारी हे पुन्हा भेटलेले कुटुंब ‘सकाळ’ प्रतिनिधीशी बोलले.

Grandmother and grandson met again on Monday in Nagar Quail Railway.
Maharashtra ZP School: राज्यात जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश; शिक्षण विभागाचा निर्णय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com