Grape Industry
sakal
नाशिक: यंदाच्या अस्मानी संकटाने नाशिकच्या द्राक्ष इंडस्ट्रीला अक्षरशः खिळखिळे केले आहे. केवळ द्राक्ष उत्पादक शेतकरीच नव्हे, तर या उद्योगाच्या प्रगतीत मोलाचा वाटा असलेल्या हजारो मजुरांनाही या आर्थिक तोट्याची मोठी झळ सोसावी लागते. यंदा द्राक्ष हंगामासाठी लागणाऱ्या मनुष्यबळात तब्बल ४० टक्क्यांनी घट झाली असून, येणाऱ्या काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.