Raisin Industry
sakal
नाशिक: यंदाच्या अतिवृष्टीसह अवकाळी पावसाने जिल्ह्यातील द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान केले आहे. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात ७० ते ८० टक्क्यांपर्यंत झालेल्या संभाव्य घटीचा थेट फटका आता बेदाणा उद्योगालाही बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दर वर्षी १०० कोटींहून अधिक होणारी उलाढाल यंदा केवळ २० ते ३० कोटींवरच येऊन थांबणार असल्याची भीती व्यक्त केली जात असून, जिल्ह्यातील बेदाणा व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटाच्या छायेत आहेत.