grape crop
sakal
नाशिक: यंदाच्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने केवळ शेतकऱ्यांचेच नव्हे, तर कृषी औषध क्षेत्रातील कंपन्यांचेही कंबरडे मोडले आहे. द्राक्षबागांच्या झालेल्या मोठ्या प्रमाणातील नुकसानामुळे नाशिक जिल्ह्यातील औषध कंपन्यांना तब्बल साडेतीनशे कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी, विक्री ठप्प झाल्याने अनेक ठिकाणी कर्मचारी कपातीची तलवार लटकू लागली आहे.