Grape
sakal
नाशिक: यंदाच्या हंगामात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि हवामानातील अनिश्चिततेमुळे द्राक्ष उत्पादकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उत्पादनात तब्बल ७० ते ८० टक्क्यांची घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, या संकटातून सावरण्याची धडपड सुरू आहे. अशातच निर्यातक्षम द्राक्षाच्या नमुना तपासणीसाठी लागणारा जवळपास दहा हजार रुपयांचा खर्च शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसत असल्याने असंतोष वाढत आहे. हा खर्च संबंधित निर्यातदारांनी उचलावा, अशी मागणी सध्या द्राक्ष उत्पादकांकडून जोर धरत आहे.