Grapes
sakal
नाशिक: नाशिक जिल्ह्यात निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाचे प्रमाण वाढविण्यासाठी अनेक निर्यातदार कंपन्या परदेशातील ‘द्राक्षगुरू किंवा तज्ज्ञांना पाचारण करतात. आधुनिक तंत्रज्ञान, सूक्ष्म व्यवस्थापन आणि दर्जेदार उत्पादनाचे मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने शेतकरीही अशा सल्लागारांवर भरवसा ठेवतात. मात्र, प्रत्यक्षात या तज्ज्ञांच्या सल्ल्याचा मेळ स्थानिक वातावरणाशी न बसल्याने शेतकरी अपेक्षित यश मिळवू शकत नाहीत. उलट खर्चाचा बोजा वाढून शेतकरी अधिकच अडचणीत सापडत असल्याची वस्तुस्थिती उघड होत आहे.