Grapes
sakal
नाशिक: अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे यंदा भारतीय द्राक्षांच्या निर्यातीत तब्बल ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता निर्यातदारांनी व्यक्त केली आहे. उत्पादन घटल्याने निर्यातक्षम द्राक्षांचे दर तेजीतच राहणार असले, तरी भारतीय बाजारपेठेला दक्षिण आफ्रिका, पेरू आणि चिली या देशांचे आव्हान यंदाही कायम राहील.