esakal | देशात महिनाअखेर पोचतील रसाळ गोमटी द्राक्षे!
sakal

बोलून बातमी शोधा

Grapes

देशात महिनाअखेर पोचतील रसाळ गोमटी द्राक्षे!

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : द्राक्षपंढरीतील अजून किमान २५ हजार टन द्राक्षे(grapes) शीतगृहात(Cold storage) शिल्लक असून, ती महिनाअखेरपर्यंत कोलकता, दिल्ली, सिलीगुडीच्या बाजारपेठेत पोचतील. शिवाय बांगलादेशमध्ये पाठविली जातील. पाच किलोच्या बॉक्सची किंमत ४५० रुपये असली, तरीही खर्च वगळता किलोला निव्वळ ४० रुपयांचा भाव मिळतो. याशिवाय यंदा देशातून गेल्या वर्षीपेक्षा एक हजार १२२ कंटेनर्सनी अधिक द्राक्षांची निर्यात(export) झाली आहे. ( 1122 containers of grapes have been exported from the country)

मार्चपासून बागांची एप्रिल छाटणी सुरू

गेल्या वर्षी सहा हजार ८४२ कंटेनर्समधून ९२ हजार ३४२ टन द्राक्षांची निर्यात झाली होती. यंदा सात हजार ९६४ कंटेनर्समधून एक लाख सहा हजार ८०९ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. नेदरलँडमध्ये(Netherland) पाच हजार १५३, इंग्लंडमध्ये(England) एक हजार ३८९, जर्मनीमध्ये(Germany) ७४८, फिनलँडमध्ये(Finland) १०४, डेन्मार्कमध्ये(Denmark) ७८, स्पेनमध्ये(Spain) ५६, स्वित्झर्लंडमध्ये(switzerland) ५५, आयर्लंडमध्ये(Ireland) ५१ कंटेनर्समधून द्राक्षांची निर्यात झाली आहे. दरम्यान, यंदाच्या हंगामातील द्राक्षांची काढणी संपल्यावर तीन आठवड्यांची विश्रांती देऊन शेतकऱ्यांनी मार्चपासून बागांची एप्रिल छाटणी सुरू केली आहे. एप्रिल छाटणीची कामे अंतिम टप्प्यात पोचली आहेत.

हेही वाचा: "पब्जी-2'मधून पुन्हा एकदा मोठ्या अनर्थाची शक्‍यता !

शेंडे खुडण्याची कामे होतील सुरू

गेल्या महिन्यात खरड एप्रिल छाटणीची कामे झालेल्या बागांमध्ये शेंडे खुडण्याची (सबकेन) कामे सुरू होतील. जूनमध्ये सुरू होत असताना जमिनीत नायट्रोजन आणि जिब्रॅलिकचे प्रमाण वाढते. त्यामुळे पावसापूर्वी सबकेनची कामे करून घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. याशिवाय ऑक्टोबर छाटणीतून चांगले घड येतील, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. जिल्ह्यात एक लाख ६० हजार, तर राज्यात तीन लाख एकर द्राक्षांची बाग आहे. सध्याचे हवामान आणि उरलेल्या कामांच्या पार्श्‍वभूमीवर यंदा द्राक्षांचा चांगला हंगाम राहील, असा विश्‍वास शेतकऱ्यांना वाटतो आहे.

हेही वाचा: अचूक वीजबिल हवंय? कोरोना काळात महावितरणची विशेष सुविधा