Grapes Season : जिल्ह्यातील द्राक्षहंगामाचा श्रीगणेशा! फेब्रुवारीत गती येणार

पिंपळगावहून दररोज दोनहजार टन द्राक्ष परराज्यात होताहेत रवाना
Grape season
Grape season esakal

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : खवैय्याच्या जिभेवर अवीट गोडी पेरण्यासाठी निफाड, दिडोंरी, चांदवड तालुक्यातील मधाळ द्राक्ष हंगामाचा पडदा बाजूला सरकला आहे. अवकाळी पावसाने स्थानिक द्राक्षांना दणका दिला तर पराज्यात थंडी, धुके यामुळे यंदा पंधरा दिवस उशिराने द्राक्ष हंगामाला सुरवात झाली आहे.

सरासरी ५० रूपये किलोने द्राक्षांचे सौदे होत असून दरातही अद्याप गोडवा आलेला नाही. दररोज दोनहजार टन द्राक्ष परराज्यात पाठविण्यात येत आहेत. दहा फेब्रुवारीनंतर द्राक्ष हंगाम भरात येईल असा अंदाज आहे. (Grapes Season Shri Ganesha of districts grape season Speed ​​will come in February nashik news)

मकरसंक्रांतीनंतर पिंपळगाव परिसरातील द्राक्ष हंगामाला गोडवा येतो. यंदा मात्र प्रतिकुल हवामानाने द्राक्षउत्पादकांची कसोटी पाहिली. लांबलेला पाऊस व थंडीमुळे द्राक्षहंगामाची रया जाते की काय अशी स्थिती होती. या आव्हानात्मक परिस्थितीला तोड देत शेतकऱ्यांनी दर्जेदार द्राक्ष पिकविले आहेत.

दिवसाला दोन-दोन औषध फवारणी केल्या. सध्या आगाप व आक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात छाटणी झालेल्या बागामध्ये द्राक्षमण्यात साखर उतरून परिपक्व झाली आहे. मधाळ द्राक्ष लगडली असून खरेदीसाठी परप्रांतीय व्यापारी दाखल होत आहेत.

सध्या दिल्ली, कलकत्ता, गुजरात, पश्‍चिम बंगाल, सिलीगुडी आदीसह देशभरात द्राक्ष पोहचत आहे. यासह उगांव, वडनेरभैरव, मोहाडी, खेडगाव येथून ९० ट्रक रवाना होत आहे. दररोज सुमारे दोन हजार टन द्राक्ष नाशिक जिल्ह्यात परराज्यात पोचत आहेत. थॉमसन व सफेद वाणाच्या द्राक्षाला सरासरी ३० तर सोनाका, काळीच्या द्राक्षांना ६० ते ८० रूपये प्रतिकिलोने सौदे होत आहे.

परराज्यातील मुख्य बाजारपेठा असलेल्या शहरामध्ये थंडी व धुक्याचा कहर सुरू आहे. त्यामुळे द्राक्षाची मागणी अद्याप वाढलेली नाही. थंडी जाऊन तापमान वाढताच द्राक्ष दर वधारतील.हंगामाचा श्रीगणेशा झाल्याने द्राक्षनगरी गजबजू लागली आहेत.'

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

Grape season
Nashik News : उपशिक्षणाधिकारी सेवाप्रवेश नियमात सुधारणा; शिक्षण विस्तार अधिकारींना पदोन्नतीची संधी

परराज्यात पावसाचा कहर...

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये जानेवारी महिन्यात द्राक्षाला मागणी वाढते. पण तेथे सध्या अवकाळी पावसाने धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे तेथे मागणी नसल्याने सरासरी १० रूपये किलोने बाजारभाव खाली आले आहेत, मात्र परस्थिती लवकरच सुधारणार असल्याने अपेक्षा वाढल्या आहेत.

व्यापाऱ्यांची प्रतीक्षा...

जिल्ह्यात अद्याप द्राक्ष हंगामाने गती घेतलेली नाही. फेब्रुवारीचा पहिल्या आठवड्यात हंगाम भरात येईल. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परप्रांतीय व्यापाऱ्यांची प्रतीक्षा आहे. दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणारा हंगाम प्रतिकूल वातावरणामुळे लांबला. पावसाचे विघ्न दूर झाल्यानंतर एकाच वेळी द्राक्षबागाची छाटणी झाली, त्यामुळे एकाचवेळी बंपर पीक काढणीला येऊ शकते.

"गतदोन वर्ष कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनने शेतकऱ्यांना मातीमोल दरात द्राक्ष विकावी लागली. यंदाचे वर्ष ही शेतकऱ्यांना कसोटी पाहणारे ठरले. अवकाळी पाऊसाने औषध फवारणीचा खर्च दुपटीने वाढला. पन्नास रूपये किलोच्या पुढे स्थानिक बाजारपेठत द्राक्ष विकली गेली तर दोन पैसे शेतकर्याना मिळुशकतील." - दौलतराव कडलग, शेतकरी, वडाळीनजीक.

"अजून परराज्यात थंडी असल्याने द्राक्षाला मागणी नाही. आतापर्यत पाठविलेल्या द्राक्षांतून व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. तापमान वाढताच द्राक्षाला मागणी वाढून दरही वधारतील."

- संतोष निकम, द्राक्ष व्यापारी.

Grape season
SAKAL Drawing Competition 2023 : सकाळ चित्रकला स्पर्धा पोहचली अतिदुर्गम शाळेत!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com