green gym
green gym esakal

Nashik News : पोलिसांची ग्रीन जिम अडकली वाहनांच्या विळख्यात

Published on

सिडको (जि. नाशिक) : अंबड पोलिस ठाण्यामागे गेल्या चार ते पाच वर्षांपूर्वी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा विचार करून ग्रीन जिम बसविण्यात आली होती. ही ग्रीन जिम सद्यःस्थितीत पोलिसांनी कार्यवाही अंतर्गत जमा केलेल्या वाहनांच्या विळख्यात सापडली आहे. (green gym for police got stuck in vehicle congestion nashik news)

याचा उपयोग कोणासही करता येत नसल्याने येथे ग्रीन जिम उभारलीच कशासाठी, असा प्रश्न उपस्थित राहत आहे. पोलिस खात्यात काम करायचे म्हटले की घरी जाण्याची निश्चित वेळ कोणासही ठाऊक नसते.

कामाच्या अतिरिक्त वेळेमुळे पोलिस स्वतःच्या तब्येतीकडे कधीही लक्ष देऊ शकत नसल्याने त्यांना विविध आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागत असते. अशा वेळी शारीरिक व्यायाम करण्यासाठी स्वतंत्र वेळ काढून व्यायाम शाळेत जाणे तर अजिबात शक्य नसल्याचे वास्तवादी चित्र समोर येत आहे.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

green gym
Nashik News : चांदवड, देवळा, कळवणमधील 9 कृषी निविष्ठा केंद्रांचा परवाना निलंबित?

अशा स्थितीत पोलिस निरीक्षकांनी आपापल्या पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवसभरात थोडा वेळ निश्चित करून या ग्रीन जिमच्या माध्यमातून थोडातरी व्यायाम करण्यास प्रवृत्त करायला सांगायला पाहिजे. यामुळे या ग्रीन जिमचा खऱ्या अर्थाने उपयोग घेणे सर्वांनाच शक्य होऊ शकेल. यामुळे या वाहनांच्या विळख्यात अडकलेली ग्रीन जिमदेखील मोकळी होण्यास मदत होईल.

green gym
Nashik News : जलजीवन योजनेची पाईपलाईन आली उघड्यावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com